आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीडन:जगातील पहिल्या आइस हॉटेलचे पाच महिन्यांनी होते नदीत रूपांतर

स्टॉकहोम7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बर्फाच्या 550 लाद्यांच्या साह्याने साकारले थंडगार हॉटेल

स्वीडनचे हे आइस हॉटेल दरवर्षी पर्यटकांचे आकर्षण ठरते. मात्र बर्फाचे हे हॉटेल साकार झाल्याच्या पाच महिन्यांनंतर नदीत रूपांतरित होते. १९८९ मध्ये पहिल्यांदा असे भव्य हॉटेल साकारले गेले. यंंदा या परंपरेचे ३१ वे वर्ष आहे. यंगवे बर्गक्विस्ट हे त्याचे संस्थापक. लुका रोनकोरोनी हे क्रिएटिव्ह डायरेक्टर असून महामारीचा विचार करून ६ प्रकारच्या सुइटमध्ये १२ बेडरूम, आइसबार, आहेत. ही हॉटेल आर्क्टिक सर्कलपासून २०० किमी अंतरावरील टॉर्न नदीजवळ आहे. येथील तापमान उणे १८ ते ४० अंशांपर्यंत असते. येथे दरवर्षी सुमारे ७० हजारांहून जास्त लोक सुटी साजरी करण्यासाठी येतात. परंतु यंदा महामारीमुळे मर्यादित लोक येण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच केवळ ६ सुइट तयार केले आहेत. गेल्या वर्षी १२ कक्षांची व्यवस्था करण्याची आली होती.

बर्फाच्या ५५० लाद्यांच्या साह्याने साकारले थंडगार हॉटेल

हॉटेल साकारण्यासाठी बर्फाच्या ५५० लाद्या लागल्या. प्रत्येक लादीचे वजन सुमारे अडीच टन आहे.
हॉटेल साकारण्यासाठी बर्फाच्या ५५० लाद्या लागल्या. प्रत्येक लादीचे वजन सुमारे अडीच टन आहे.

स्वीडनच्या कलाकारांचे परिश्रम

स्वीडनच्या २४ कलाकारांनी हॉटेल प्रत्यक्षात आणले. हे तयार करण्यासाठी १८ दिवसांचा कालावधी लागला. आइस हॉटेल ११ एप्रिल २०२१ पर्यंत वितळून जाईल. गेल्या वर्षी १६ देशांतील ३३ कलाकारांनी केवळ एका आठवड्यात असे हॉटेल साकारले होते.

बातम्या आणखी आहेत...