आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The World's First Plastic free PPE Shield, Priced At Rs 48, Will Automatically Disappear In 3 Days After Use

पर्यावरणाची काळजी:जगातील पहिली प्लास्टिक मुक्त पीपीई शील्ड, किंमत फक्त 48 रुपये; वापरल्यानंतर 3 दिवसात आपोआप नष्ट होईल

दिव्य मराठी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्यावरण संरक्षण आणि प्लॅस्टिक विरोधात मोहीम राबवणाऱ्या 'अ प्लॅस्टिक प्लॅनेट'ने पर्यावरण अनुकूल पीपीई तयार केले

पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकविरूद्ध मोहीम राबविणाऱ्या ‘अ प्लॅस्टिक प्लॅनेट’ संस्थेने एक विशिष्ट पीपीई शील्ड तयार केली आहे. ही जगातील पहिली प्लास्टिक मुक्त पीपीई शील्ड आहे. ही शील्ड लाकडातून निघणाऱ्या सेल्यूलोज आणि कागदाने तयार केली आहे. लवकरच याची विक्री सुरू होईल. एका पीपीई शील्डची किंमत 48 रुपये आहे. 150 पीपीईचे पॅकेट 7000 रुपयांत उपलब्ध होईल. 

4 पॉईंट : प्लास्टिक मुक्त पीपीई शिल्ड विशेष का आहे

सेंद्रिय कचर्‍यासह नष्ट करता येते :

शील्ड तयार करणाऱ्या 'अ प्लॅस्टिक प्लॅनेट' संस्थेच्या डिझाइनरच्या मते हेडबँड सहजतेने अॅडजस्ट केले जाऊ शकते. एकदा वापल्यानंतर सेंद्रिय कचऱ्यासोबत ती नष्ट करता येते. 

विषाणूचा प्रसार होण्याचा कोणताही धोका नाही :

अमेरिकन कंपोस्टिंग काउंसिलचे म्हणणे आहे की, या शील्डमुळे कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचा कोणताही धोका नाही. प्लास्टिकमुक्त असल्याने, हे पीपीई कचर्‍यामध्ये 3 दिवसात आपोआप नष्ट होईल. 

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचे उद्दीष्ट :

संस्थेचे सह-संस्थापक सियान सुदरलँड यांचे म्हणणे आहे की ते तयार करण्याचे उद्दीष्ट प्लास्टिक प्रदूषण कमी करणे हे आहे. सध्या वापरलेला पीपीई वापरल्यानंतर शतकानुशतके वातावरणात कायम राहतील. म्हणूनच, एक पीपीई तयार केली जी सेंद्रीय कचर्‍यामध्ये आपोआप नष्ट होईल.

पीपीईला प्लास्टिक फ्री ट्रस्ट मार्क संस्थकडून मिळाली मान्यता 

युरोपियन इकॉनॉमिक एरियानेही पीपीईवर शिक्कामोर्तब केले आहे. प्लॅस्टिक फ्री ट्रस्ट मार्क ऑर्गनायझेशनकडूनही याची तपासणी करण्यात आली असून मान्यता देण्यात आली आहे. ही शील्ड सिंगल किंवा पॅकेटमध्ये खरेदी करता येईल. लवकरच बाजारात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मास्क वापरल्यानंतर लोक ते कोठेही फेकत आहेत. अलीकडेच हाँगकाँगच्या सोको आयलँडच्या किनाऱ्याव शेकडो मास्क सापडले होते. यामुळे संसर्गाच्या धोक्यासह पर्यावरणासाठी अडचणी वाढवत आहेत. याचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...