आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात ५९ लाख नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत, तर साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अशा स्थितीत डेन्मार्क येथील वैज्ञानिकांनी एक रोबोट तयार केला आहे, जो कोरोना चाचणी स्वतः पूर्ण करेल. स्वॅबदेखील तो स्वत:च घेईल. याचा फायदा म्हणजे चाचणी करणारे आरोग्य कर्मचारी संसर्गापासून सुरक्षित राहतील. हा रोबोट दक्षिण डेन्मार्क विद्यापीठाने तयार केला आहे. कोरोना टेस्टसाठी वापरण्यात येणारा हा जगातील पहिला पूर्णपणे स्वयंचलित रोबोट आहे.
हा तयार करणारे प्रोफेसर थियुसियुस रजीत स्वारीमुथू सांगतात, रोबोटने गळ्यात जेथे पोहोचवायचे तेथे स्वॅब अत्यंत आरामशीर पोहोचवला हे पाहून मला आश्चर्य वाटले. हे खूप मोठे यश आहे. ते दहा लोकांच्या टीमसह एका महिन्यापासून रोबोट विकसित करत होते. सध्या, चाचणीसाठी नमुना घेताना आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालणे आवश्यक आहे. ते पुन्हा वापरता येणार नाहीत म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी किमान ८-९ तास तरी ते परिधान करावे अशी अपेक्षा आहे. यात रोबोटची मदत होईल.
जूनपासून होऊ शकतो ३-डी प्रिंटरने तयार केलेल्या रोबोटचा वापर
रुग्ण या रोबोटसमोर बसतो आणि तोंड उघडतो आणि रोबोट त्याच्या तोंडात स्वॅब टाकतो. मग नमुना घेऊन, रोबोट स्वॅब टेस्ट ट्यूबमध्ये ठेवतो आणि त्यावर झाकणदेखील लावतो. विशेष म्हणजे स्वॅब टेस्ट अचूक होते. तथापि, नमुना घेणाऱ्यांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. मात्र रोबोटमुळे हा धोका कमी होईल. ३-डी प्रिंटर तंत्रज्ञानासह बनवलेल्या या रोबोटचा वापर जूनपासून सुरू होऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.