आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात प्राचीन रोपटे, 4500 वर्षांपूर्वी बीजारोपण, 180 चौरस किमी विस्तीर्ण

ऑस्ट्रेलियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेकडील शार्क बे येथील सागरी गवताबद्दलची अनाेखी माहिती समोर आली आहे. पाण्याखाली पसरलेले हे गवत म्हणजे एकाच रोपट्याचे रूप आहे. सुमारे ४५०० वर्षांपूर्वी एका बीजारोपणातून त्याचा विस्तार झाल्याचे संशाेधकांचे म्हणणे आहे. हे सागरी गवत १८० चौरस किलाेमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले एकाच रोपट्याचे रूप आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीच्या संशाेधकांच्या मते, शार्क बेमध्ये सामान्यपणे रिबन वीड ही गवताची प्रजाती आढळून येते. तिच्या अभ्यासासाठी गेलाे होताे. या काळात संशाेधकांनी संपूर्ण खाडीतून नमुने संकलित केले. १८ हजार जेनेटिक मार्क्सचा अभ्यास केला. यातून प्रत्येक नमुन्याचे फिंगरप्रिंट तयार करून अभ्यास केला. वास्तविक किती प्रकारचे गवत मिळून समुद्रातील गवताळ मैदान तयार होते, हे संशाेधकांना जाणून घ्यायचे होते. या संशाेधनाबद्दलची माहिती प्रोसिडिंग्ज ऑफ द सोसायटी बीमध्ये प्रकाशित झाली. संशाेधक जेन एडगेलाे म्हणाले, शार्क बेमध्ये केवळ एक रोपटे होते. आता त्याचा विस्तार १८० किलाेमीटर एवढा झाला आहे. हे आजवरचे पृथ्वीवरील ज्ञात असे सर्वात मोठे रोपटे ठरले आहे. हे सर्व अद्भुत आहे. कारण खाडीतील वेगवेगळ्या परिस्थितीतही हे रोपटे टिकून आहे.जेन यांच्या सहकारी डॉ. एलिझाबेथ सिंकलेअर म्हणाल्या, कोणतीही फुले उगवली नसताना आणि बीजांचे उत्पादन झाले नसतानाही हे रोपटे खूप बळकट आहे.

प्रतिकूलमध्ये रोपटे टिकून कसे? संशाेधकांना कोडे
शार्क बे ही जागतिक वारसास्थळांत समाविष्ट असलेली खाडी आहे. संशाेधकांनी सागरी जीवन हे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. तेथे संशाेधकांनी अनेक प्रकारचे प्रयोग करत आहेत. यातून प्रतिकूल परिस्थितीतही हे महाकाय रोपटे जिवंत कसे राहिले हे शाेधण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...