आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय व्यावसायिक गेल्या वर्षापासून वेबसाइट चेक करत आहेत. अपॉइंटमेंट बुक करताना वेबसाइटला रिफ्रेश करतात तेव्हा अर्जदार ७२ तासांसाठी लॉक होतो, हीदेखील एक समस्या आहे. अमेरिकेत इमिग्रेशन वकीलही आपल्या पक्षकारास तूर्तास अमेरिका न सोडण्याचा सल्ला देत आहेत. ते सांगतात, एेनवेळी मुलाखत रद्द झाल्यास भारतात अडकून जाल. त्यामुळे भारतात जाऊ नका.
इमिग्रेशन वकील भारतीयांना सांगताहेत-भारतात गेल्यास अडकून जाल
१. साऊथ बोस्टनमधील रुमॅटालॉजिस्ट डॉ. गगन महाजन दोन वर्षांपासून भारतात आलेले नाहीत. मुलाचा वाढदिवस ते भारतात करू इच्छित होते. मात्र, कोरोनादरम्यान व्हिसाची मुदत संपली. ते अमेरिकेतून बाहेर पडू शकतात, परंतु व्हिसाचे नूतनीकरण झाल्याशिवाय परतू शकणार नाहीत. नूतनीकरणासाठी दिल्लीतील अमेरिकी वकिलातीत मुलाखतीची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्याला वर्षभर वेटिंग आहे.
2. सॅन फ्रान्सिस्कोमधील अनुराधा पिल्लई हार्डवेअर इंजिनिअर आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोविडमुळे त्यांच्या आई-वडिलांचे चेन्नईत निधन झाले. व्हीसीवर त्यांनी अंत्यसंस्कार पाहिले. आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली म्हणून त्या चेन्नईला जाऊ इच्छितात. परंतु, व्हिसाची मुदत संपणार आहे. भारतात अडकून पडले तर आपल्या नोकरीचे काय होणार, ही चिंता त्यांना लागून राहिली आहे.
डॉ. महाजन आणि अनुराधा यांच्यासारख्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना भारतात येता येत नाही. भारतात अमेरिकी वाणिज्यिक दूतावासांत मुलाखतींसाठी रिक्त स्लॉट नाही हे त्याचे कारण. कोरोनाकाळात त्यांचा वर्क व्हिसा संपला होता. ते भारतात आले तर अमेरिकेत परतण्यासाठी व्हिसा नूतनीकरण आवश्यक आहे. दूतावासात प्रत्यक्ष हजर राहून व्हिसावर शिक्कामोर्तब करून घ्यावे लागते. अमेरिकेत प्रवेशाची ही अनिवार्य प्रक्रिया आहे.
क्कामोर्तबासाठीच अपॉइंटमेंट मिळत नाही. त्यामुळे त्यांना भारतातच अडकून राहण्याची भीती सतावत आहे. परतू शकलो नाही तर नोकरी जाईल आणि व्हिसाही एक्स्पायर होईल, अशी भीती त्यांना सतावत आहे. इमिग्रेशन अॅटर्नी एनेलिस थॉमस यांच्या मते, महामारीत अनेक दूतावास बंद होते. त्यामुळे बॅकलॉग वाढला. आतापर्यंत व्यावसायिक अपॉइंटमेंटच्या हिशेबाने भारतात येत होतो आणि मुलाखत पार पडताच अमेरिकेला परतत होतो. महामारीने सर्व काही बदलून टाकले. अमेरिकी दूतावासाच्या संकेतस्थळानुसार ८ ते १३ महिन्यांचा प्रतीक्षा काळ आहे. त्याची स्थिती दर आठवड्याला बदलते. परंतु अपॉइंटमेंट मिळेल याची शाश्वतीच नाही. नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासातील प्रवक्ता एरियरल पोलक म्हणाल्या, पुढील दोन दिवसांत व्हिसा मुलाखतीसाठी अजूनही वेळ लागू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.