आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • There Is No Grain To Eat In The House In Pakisthan, Yet The Purchase Of Arms Continues! 65 Crore Arms Purchase In 2021

पाकिस्तान:घरात खायला दाणे नाहीत, तरीही शस्त्र खरेदीत पुढे! 2021 मध्ये 65 कोटी डॉलरची शस्त्र खरेदी

इस्लामाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्त - शेजाऱ्याची २०२० मध्ये २६ कोटी, तर २०२१ मध्ये ६५ कोटी डॉलरची शस्त्र खरेदी

एकीकडे पाकिस्तानात लोक पीठ, डाळ आणि औषधींसाठी रांगेत उभे आहेत, तर दुसरीकडे लष्कराला आर्थिक संकटाची झळही नाही. सरकारने लष्कराच्या बजेटमध्ये आणि शस्त्र खरेदीत कपात केली नसल्याचे अफगाण डायस्पोरा नेटवर्कच्या अहवालातून समोर आले.

देशात आर्थिक संकटामुळे विकास क्षेत्र, आरोग्य, शिक्षण आणि निवासात मोठी कपात करण्यात आली. मात्र आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सरकारचे बजेट १.५३ लाख कोटींचे राहील, असा अंदाज आहे. २०२१-२२ मधील मूळ सैन्य खर्चापेक्षा १२ टक्के अधिक आहे. अहवालानुसार लष्कराच्या खरेदीवरील नवा डेटा गोपनीय आहे. परंतु मागील बजेटमधील विश्वसनीय आकड्यांवरून चित्र स्पष्ट होते. २०२१ मध्ये लष्कराने २६.३ कोटी डॉलर्समध्ये सैनिकी वाहने खरेदी केले होते. तर त्यापूर्वी २०२० मध्ये ९.२ कोटी डॉलरची खरेदी केली होती. त्याचप्रमाणे २०२१ मध्ये नौदलासाठी ३५.८ कोटी डॉलरचे जहाज आणि सुटे भाग खरेदी केले गेले. याही पूर्वी १४.५ अब्ज डॉलरची खरेदी केली होती. हवाईदलासाठी चीनकडून ड्रोन व सेन्सॉर खरेदीसाठी बजेट वाढवले गेले. २०२१ मध्ये २.५ कोटी डॉलरचे सेन्सर आयात केले गेले.

कोराेना आणि महापुरानंतरही लष्कराकडे पैशांची कमतरता नाही
अहवालात म्हटले की, पाकिस्तानात सध्या जे काही होत आहे, यासाठी शहबाज सरकारसोबतच लष्करही जबाबदार आहे. पाकिस्तानी लष्कराने सन २०१९ मध्ये ६६.९ कोटी डॉलर निर्माण केले. ते २०२० मध्ये ७६ कोटींवर पोहोचले. तसेच २०२१ मध्ये ९९.४ कोटींपर्यंत गेले. हा काळ असा होता की, तेव्हा पाकिस्तान कोरोना आणि महापुराचा सामना करत होता. जनतेचे सर्वस्व हिसकावून पाकिस्तानी लष्कर व नेते लठ्ठ झाले आहेत हे नाकारता येणार नाही.लष्कराने विविध व्यापारातून कमावलेली आपली १० अब्ज डॉलर (सुमारे २.६२ लाख कोटी पाकिस्तानी रुपये ) ची रक्कम संकटाच्या काळातही पाकिस्तानी सरकारला देण्यास नकार दिला होता.

धक्का : पाकच्या विदेशी संपत्तीची किंमत १८ हजार कोटींनी घटली
गरिबीच्या काळात पाकिस्तानला विदेशी संपत्तीबाबतही झटका बसला आहे.
त्याच्या विदेशातील संपत्तीचे मूल एका महिन्यात १८,२०० कोटी पाकिस्तानी रुपयांनी घटले आहे. डिसेंबरमध्ये या संपत्तींचे मूल्य १.३७ लाख कोटी रु. होते. ते जानेवारीत १.१९ कोटी झाले. पाकिस्तान पैशांसाठी विदेशी संपत्ती विकत आहे.
{ ‘मूडी’ ने पाकिस्तानचे रेटिंग ‘Caa3’ केले तर आंंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज देणे एक प्रकारे टाळले आहे.

इकडे, रशियाने चीनकडून घेतले युरेनियम, अमेरिकेला धास्ती

रशियाने चीनकडून अण्वस्त्रांत वापरले जाणारे उच्च दर्जाचे युरेनियम खरेदी केले आहे. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली. तैवानच्या उत्तर किनाऱ्यावरून चीनने रशियाला अण्वस्त्र इंधन दिले. सीएफआर-६०० या वर्षी शस्त्र-ग्रेड प्लुटोनियमचे उत्पादन सुरू करेल आणि पुढील १२ वर्षे चीनला शस्त्रभांडार चारपट करण्यास मदत करेल, अशी शक्यता अमेरिकी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. असे झाल्यास चीनची शस्त्रक्षमता रशिया व अमेरिकेच्या बरोबरीने होईल.

बातम्या आणखी आहेत...