आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक:वंशभेदावर लस नाही, आता सर्वांनीमिळून ताे दूर करायला हवा : हॅरिस

वाॅशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतवंशीय कमला हॅरिस डेमाेक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार म्हणून जाहीर

अमेरिकेत डेमाेक्रॅटिक पार्टीने भारतवंशीय सिनेटर कमला हॅरिस (५५) यांच्या नावाची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घाेषणा केली. याबराेबर हॅरिस अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय व दक्षिण आशियाई वंशाच्या महिला ठरल्या आहेत. यानिमित्ताने हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचे मूळ शहर विलमिंग्टन येथील एका हाॅटेलमधून भाषण दिले. हॅरिस म्हणाल्या, ‘माझी आई १९ व्या वर्षी कर्कराेगाच्या उपचारासाठी भारतातून अमेरिकेत आली हाेती. त्यांची भेट कॅलिफाेर्निया विद्यापीठात माझ्या वडिलांशी झाली. तेव्हा ते अर्थशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी जमैकातून अमेरिकेत आले हाेते. म्हणूनच मी भारत व जमैकाहून अमेरिकेत आलेल्या लाेकांची मुलगी आहे. ट्रम्प यांच्यावर हॅरिस यांनी भाषणातून जाेरदार टीका केली. गेल्या चार वर्षांत ट्रम्प यांनी देशात केवळ फूट पाडण्याचे प्रयत्न केले. ते देशाचे नेतृत्व करण्यात अयशस्वी ठरले. संपूर्ण देशात वंशभेदाच्या विराेधात आक्राेश आहे. परंतु वंशभेदावर लस उपलब्ध नाही. सर्वांनी मिळून हा राेग दूर करू. सर्वांची एकजूट घडवू .’

हॅरिस यांची बलस्थाने : तरुण-आशियाई, आफ्रिकी वंशाच्या लाेकांचा पाठिंबा, कडक पोलिसासारखी छबी
तरुण फळी पाठीशी : सद्य:स्थितीत डेमाेक्रॅटिक पार्टीचे तरुणांना जास्त आकर्षण आहे. यू-गव्ह या संशाेधन संस्थेच्या मते १८-२९ वर्षीय २६ टक्के तरुण रिपब्लिकन तर ५६ टक्के डेमाेक्रॅटचे समर्थन करतात. हॅरिस ५५ वर्षीय आहेत. बायडेन ७७ वर्षांचे आहेत. त्यामुळे हॅरिस यांची शक्यता जास्त आहे. १३ लाख भारतीय-अमेरिकींचा पाठिंबा अपेक्षित.

वंशभेदविराेधी माेहीम : कृष्णवर्णीय जाॅर्ज फ्लाइडचा पाेलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यापासून हॅरिस यांनी कायदा-व्यवस्थेत बदल घडवून आणला पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे.

कडक प्रशासक : हॅरिस यांची प्रतिमा पाेलिसांसारखी कडक बनली. ‘हॅरिस इज अ काॅप’ असे म्हटले जाते. एका प्रकरणात त्यांनी पाेलिसांची बाजू घेतली हाेती.

तयारी : भाषणासाठी पत्नी, मित्राची घेताहेत मदत
बायडेन राष्ट्रीय स्तरावरील भाषणाच्या तयारीला लागले आहेत. बायडेन यांचा प्रचार करणाऱ्या टीमचे सदस्य टेरी मॅकआॅलिफ म्हणाले, बायडेन यांचे भाषण त्यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित असेल. बायडेन सुमारे ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेत आहे. पत्नी, बहीण वॅलेरी, मित्रमंडळी, मुख्य रणनीतिकार माइक डाॅनिलन, इतिहासकार जाॅन मॅकम यांची ते मदत घेत आहेत.

ट्रम्प यांच्या शहरात भाषण
कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मूळ गाव विलमिंग्टन येथील हॉटेलमधून भाषण दिले. याप्रसंगी मंचावर त्यांच्यासमवेत पती डग्लस इमहोफ व राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बायडेनही उपस्थित होते.

वार | लाेकशाहीवर संकट, ट्रम्प पदास अयाेग्य : आेबामा
माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी डेमाेक्रॅटिक पार्टीच्या िडजिटल परिषदेत फिलाडेल्फिया येथून आपले भाषण दिले. देशातील लाेकशाहीवर संकट आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या दृष्टीने ट्रम्प अयाेग्य नाहीत. ते पुन्हा निवडून आल्यास लाेकशाहीवर अश्रू ढाळण्याची वेळ येऊ शकते. ट्रम्प प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे देशात काेराेनामुळे १.७० लाखाहून जास्त जणांचा मृत्यू झाला. लाखाे लाेक बेराेजगार झाले. एवढेच नव्हे तर जगभरात अमेरिकेची प्रतिमा मलिन झाली.

पलटवार | आेबामांना जमलेे नाही म्हणूनच मी राजकारणात : ट्रम्प
माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी चांगले काम केले नसल्यामुळे मला राजकारणात यावे लागले. आेबामा शासनकाळात बायडेन उपराष्ट्राध्यक्षपदावर अयशस्वी राहिले हाेते. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवणे अतिशय गरजेचे आहे. याआधी आेबामा यांच्या पत्नी मिशेल यांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी अयाेग्य असल्याचे म्हटले हाेते. त्यावर मिशेल यांचे भाषण लाइव्ह नव्हते, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली हाेती. हे फुटेज जुने असल्याचे सांगण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...