आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:कोरोना काळात नोकरी गेली; मुले विचारतात आपण जेवायला जाणार नाहीत?, आपण बेघर होऊ? कशी द्याल त्याची उत्तरे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जास्त तणाव न देता मुलांना कसे सांगाल आपले आर्थिक संकट

वेंडी माेगल (क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट)

लॉकडाऊन उघडण्याची स्थिती निर्माण होत असली व मुले पुढील योजना तयार करत असले तरी पालकांना सांगावे लागत आहे की, आता ते अतिरिक्त हौसेचा खर्च करू शकणार नाहीत. भाडे आणि जेवणासाठी पुरेसे पैसे असल्याचे सांगत पालक हिंमत देऊ शकतील, मात्र मुलांचे डोळे-कान तीव्र असतात. जाणून घ्या नोकरी जाण्याच्या स्थितीत प्रश्नांचा कसा सामना कराल :

चिंतेचा विचार करा

ग्राहक केंद्रित अर्थव्यवस्था आणि सेल्फ ब्रँडिंगच्या काळात आपले बजेट वाढवणे आणि ‘काय आवश्यक आहे’ ला ‘आपल्याला काय हवे’पासून वेगळे करणे कठीण आहे. या खराब वातावरणातही तुम्ही सजग पालक बनून राहाल हे नक्की करा. मुलांना विश्वास द्या की वाईट स्थितीतही तुमच्याकडे इतके पैसे असतील की बिल देता येईल आणि भोजन विकत घेता येईल. जर नवे काही तरी करत असाल, किंवा बेरोजगारी भत्ता घेत असाल तर तेही सांगा. यामुळे त्यांना आपली साधने आणि योजनांच्या बाबतीत माहिती मिळेल. त्यांचे प्रश्न काळजीपूर्वक ऐका.

सत्य सांगायचे की नाही

मुलांसोबत बोलताना ठरवा की त्यांना काय सांगायचे आहे. ते अवलंबून आहे मुलाच्या वयावर, नकारात्मक वृत्त ऐकण्याची क्षमता कशी आहे. मुलांना नवीन आर्थिक स्थितीत सामंजस्य निर्माण करण्याबाबत सांगून वस्तुस्थितीशी अवगत करू शकता. मोठ्यांसोबत वाईट झाले तर आपल्यासोबतही तसेच होईल असे लहान मुलांना वाटू शकते. वाईट स्वप्न येतील. आपण बाहेर जेवणाला जाऊ की नाही हे जाणून घेण्यासाठी किशोरवयीन उत्सुक असतील. मी आधीच्याच शाळेत जाईल का, आपण बेघर होऊ, त्यांना सांगा की काय तसेच राहील आणि काय बदलू शकते. प्रत्येक बदल सांगा.

पुढचा विचार करा

अर्थव्यवस्था सुरळीत होताच स्थितीही बदलेल हे मुलांना सांगा. नवी नोकरी मिळू शकते. तुमची स्थिती बदलू शकते. नव्या काळात पूर्ण कुटुंबाला लहानशी टीम समजा.

बातम्या आणखी आहेत...