आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनोखी काँटॅक्ट लेन्स:यातील लेझरमुळे वाहनामध्ये लाइट किंवा म्युझिक सिस्टिम चालू-बंद होऊ शकतात

लंडन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘एक्समॅन’ कॉमिक्सच्या प्रेरणेने फ्रान्समधील शास्त्रज्ञांचा आविष्कार

फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी ‘एक्समॅन’ कॉमिक्सपासून प्रेरणा घेत एक अनोखी काँटॅक्ट लेन्स तयार केली आहे. या लेन्समधून लाल रंगाची लेझर बीम बाहेर पडते आणि जेथे नजर पडते तेथे हे लेझर लक्ष केंद्रित करते. या तंत्राला गेझ रिकग्निशन म्हणतात. शास्त्रज्ञांनुसार, कॉम्प्युटर सिस्टिम्समधील संशोधनाच्या दिशेने हे तंत्रज्ञान भ‌विष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आगामी काळात माऊस किंवा टच स्क्रीनच्या वापराने कोणतेही उपकरण हाताळण्याऐवजी गेझ रिकग्निशनद्वारे कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअरचा वापर करता येईल. तसेच वाहन चालवतानाही रिमोटचा वापर न करता वाहनातील लाइट किंवा म्युझिक सिस्टिम डोळ्यांनी बंद करता येईल.

या तंत्रामध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या काँटॅक्ट लेन्सचाच वापर केला जाईल. ही विशेष काँटॅक्ट लेन्स असेल. यात वायरलेस कम्युनिकेशनवर आधारित असलेले इन्फ्रारेड लेझर पॉइंटर बसवलेले असेल. या स्मार्ट काँटॅक्ट लेन्सला सायक्लोप्सदेखील म्हणतात. एक्समॅन या प्रसिद्ध कॉमिक्समध्येही सायक्लोप्स लेन्सचा वापर केला आहे. एक्समॅनमधील अभिनेता अनेकदा या तंत्राचा वापर करताना दिसून येतो.

२०२१ मध्ये बीएमडब्ल्यू कारमध्ये दिसू शकते हे तंत्रज्ञान
जर्मनीतील कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूने गतवर्षी बार्सिलोनामध्ये झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या तंत्राने सज्ज असलेली कार ठेवली होती. २०२१ पासून बीएमडब्ल्यू आयनेक्स्ट कारमध्ये गेझ रिकग्निशन तंत्राचा वापर केला जाईल. यात व्हॉइस रिकग्निशनही असेल. बीएमडब्ल्यूने याला नॅचरल इंटरॅक्शन म्हटले आहे. यामुळे तुम्ही नजरेच्या साहाय्याने उपकरणावर नियंत्रण ठेवू शकाल, तर व्हॉइस रिकग्निशनद्वारे बोलूनही उपकरण चालवता येईल.