आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Things That Happen Off Campus Are Beyond The Control Of The School; U.S. Supreme Court Ruling In Favor Of Student; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य:कॅम्पसबाहेर घडणाऱ्या गोष्टी शाळेच्या नियंत्रणाबाहेर; अमेरिकी सुप्रीम कोर्टाचा निवाडा विद्यार्थिनीच्या बाजूने

वॉशिंग्टन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडिया पोस्टवर विद्यार्थिनीस शाळेतून काढले

२०१७ मध्ये पेन्सेल्व्हेनियाच्या १४ वर्षीय ब्रँडी लेव्हीला साेशल मीडियावरील पाेस्टवरून शाळेतून काढण्यात आले हाेते. तेव्हा हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात जाईल याची कुणी कल्पनाही केली नसावी. परंतु या आठवड्यात हे घडले. अनेक दशकांत पहिल्यांदाच सर्वाेच्च न्यायालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काबाबत मत व्यक्त केले.मेहेनाेय एरिया हायस्कूलमधील नवव्या वर्गातील ब्रँडीने मे २०१७ मध्ये चिअर लिडर टीममध्ये सहभागी न केल्यावरून एका पाेस्टमध्ये अपशब्द लिहिले हाेते. तिच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने त्याबद्दल आक्षेपार्ह फिंगर दर्शवून नाराजी जाहीर केली हाेती. शाळेच्या प्रशिक्षकाने ही बाब नियमांचा भंग करणारी असल्याचा हवाला देत ब्रँडीला एक वर्षासाठी शाळेतून काढून टाकले आहे.

ब्रँडीच्या आई-वडिलांनी सर्वाेच्च न्यायालयात शाळेच्या विराेधात खटला दाखल केला. अमेरिकी संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीअंतर्गत ब्रँडीला टीममध्ये सहभागी करून घ्यावे. या प्रकरणात न्यायाधीशांनी ब्रँडीला शाळेत घेण्यात यावे असा निवाडा दिला. एवढी माेठी शिक्षा देण्यात यावी असा या विद्यार्थिनीने गुन्हा केलेला नाही, असे न्यायालयाने सांगितले. काेर्टाने १९६९ च्या प्रकरणाचाही उल्लेख केला. शाळेच्या कॅम्पसबाहेरील विद्यार्थ्यांच्या बाेलण्यावर शाळा नियंत्रण ठेवू शकत नाही. माझे मत मांडताना मी घाबरत नाही, असे ब्रँडीने सांगितले. त्यासाठी शिक्षा दिली जाऊ नये. मी काेणालाही लक्ष्य करून बाेलले नव्हते. त्यातून बदमाशपणा किंवा शाेषणासारखे काही नव्हते.

१४ वर्षीय कोणताही मुलगा अशी प्रतिक्रिया देतो : ब्रँडी
१८ वर्षीय ब्रँडीने न्यायालयात एक तर्क दिला. ब्रँडीने ही पाेस्ट शाळेबाहेर व सुटीच्या दिवशी केली हाेती. त्यासाठी शाळा शिक्षा देऊ शकत नाही. तेव्हा मी वैतागले हाेते. १४ वर्षीय काेणत्याही मुलाने अशीच प्रतिक्रिया दिली असती.

बातम्या आणखी आहेत...