आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्याभरात भारतीयांवर तिसरा वर्णद्वेषी हल्ला:​​​​​​​पोलंडमध्ये राहणारा अमेरिकन भारतीयाला 'मारेकरी' म्हणाला, VIDEO व्हायरल

वारसॉएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगात भारतीयांविरोधातील वर्णद्वेषी हल्ल्यांत चांगलीच वाढ झाली आहे. ताजी घटना युरोपातील पोलंडची आहे. येथील एका अमेरिकन नागरिकाने भारतीयवंशाच्या एका व्यक्तीवर वर्णद्वेषी टीका केली. त्याचा एक व्हिडिओ सोशळ मीडियवर चांगलाच व्हायरल झाला आहे. मागील एका आठवड्यातील भारतीयांवरील हा तिसरा वर्णद्वेषी हल्ला आहे.

व्हिडिओत अमेरिकन व्यक्ती भारतीयाला पॅरासाइट अर्थात बांडगूळ व जेनोसायडर म्हणजे नरसंहार करणारा म्हणताना दिसून येत आहे. ही घटना केव्हा घडली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच पीडित भारतीय वंशाच्या व्यक्तीचीही ओळख पटली नाही.

हे भारतीय व्यक्तीचे छायाचित्र आहे. त्याने वर्णद्वेषी टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत एकदाही उलटून प्रत्युत्तर दिले नाही.
हे भारतीय व्यक्तीचे छायाचित्र आहे. त्याने वर्णद्वेषी टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत एकदाही उलटून प्रत्युत्तर दिले नाही.

भारतात निघून जा

2 मिनिट 20 सेकंदांच्या या व्हिडिओत अमेरिकन व्यक्तीने भारतीयाला वर्णद्वेषी टीका करत शिवीगाळ केली. अमेरिकन म्हणतो -तू येथे पोलंडमध्ये का राहत आहेस? तुला काय वाटते तुम्हाला पोलंड किंवा अन्य कोणत्याही देशात घुसखोरी करता येईल? तू येथे कशासाठी आला आहेस? हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुम्ही आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी काम का करत नाही? येथे ऐशोआरामाचे आयुष्य जगत आहेस. तुम्हाला आमच्या वंशाला मारायचे आहे काय? आम्हाला संपवायचे आहे? तुम्ही बांडगूळ आहात. घुसखोर आहात. भारतीयांनी युरोपात रहावे असे आमची इच्छा नाही. तुम्ही पोलिश नाही. पोलंडमध्ये केवळ पोलिश लोकच राहणार. तुम्ही भारतात निघून जा.

हे छायाचित्र अमेरिकन व्यक्तीचे आहे. यानेच भारतीय व्यक्तीविरोधात वर्णद्वेषी टीका केली.
हे छायाचित्र अमेरिकन व्यक्तीचे आहे. यानेच भारतीय व्यक्तीविरोधात वर्णद्वेषी टीका केली.

भारतीयाने व्हिडिओ तयार करण्याचा केला विरोध

अमेरिकन व्यक्ती भारतीयाच्या विरोधानंतरही व्हिडिओ तयार करत राहिला. भारतीयाने त्याला विचारले -तुम्ही माझा व्हिडिओ का तयार करत आहात. हे बंद करा. त्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकन म्हणाला - हा माझा देश आहे. मी येथे काहीही करू शकतो. माझ्याकडे व्हिडिओ तयार करण्याचा अधिकार आहे. अमेरिकेतही खूप भारतीय आहेत. सर्वत्र भारतीय आहेत. तुम्हा लोकांचा स्वतःचा देश आहे. येथून निघून जा.

अमेरिकेत भारतीयाची भारतीयाला शिवीगाळ

21 ऑगस्ट रोजी कॅलिफोर्नियाच्या फ्रेमॉन्ट शहराच्या टाको बेल रेस्टॉरंटमध्ये एका भारतीय-अमेरिकन व्यक्तीने दुसऱ्या भारतीयाची डर्टी हिंदू व डिस्गस्टिंग डॉग म्हणून हेटाळणी केली. त्याने सलग 8 मिनिटे शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी हेटक्राइम, सिव्हिल राइट्सचे उल्लंघन, असॉल्टच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल केला.

टेक्सासमध्ये भारतीय महिलांशी वर्णद्वेष

अमेरिकेच्या टेक्सासच्या प्लानो शहराच्या सिक्स्टी व्हाइन्स रेस्टॉरंटच्या बाहेर 4 महिलांनी भारतीय ढंगात गप्पागोष्टी करत होत्या. त्यावेळी मेक्सिकन-अमेरिकन वंशाच्या एका महिलेने त्यांच्यावर वर्णद्वेषी टीका व शिवीगाळ केली. महिलेने एका भारतीय महिलेच्या श्रीमुखातही भडकावली.

बातम्या आणखी आहेत...