आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑर्थोडॉक्स ख्रिसमसनिमित्ती दोन दिवसांची एकतर्फी युद्धबंदी शुक्रवारपासून सुरू झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या रशिया-युक्रेन युद्धासाठी ही सर्वात मोठी शस्त्रसंधी आहे. मात्र, रशियाने शुक्रवारीही युक्रेनवर मोठा गोळीबार केला. खेरसोनमधील अग्निशमन केंद्रावर गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, युक्रेन आणि अमेरिकेला शस्त्रसंधी रशियाचा कट वाटत आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेंस्की म्हणाले की, रशिया नातळला ढाल बनवून चाल खेळत आहे. यासोबत आपल्या लष्कराच्या पोझिशनमध्ये बदल करून आणि शस्त्र, दारुगोळ्याची जमवाजमव वाढवत आहे. झेलेंस्की म्हणाले, जगात प्रत्येकाला माहित आहे की, रशिया कशा पद्धतीने शस्त्रसंधीला नव्या ताकदीने हल्ला सुरू ठेवण्यासाठी वापर करत आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, पुतीन ऑक्सिजन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. नाताळ व नववर्षाला रुग्णालय, चर्च आणि शाळेवर बॉम्ब वर्षाव करणे त्यांनी बंद केले नाही.
हिंद महासागरात येईल रशियन युद्धनौका रशियाच्या हायरसोनिक क्षेपणास्त्राची तैनातीची युद्धनौका अॅडमिरल गोर्शकोव्ह अॅटलांटिक महासागर व भूमध्य समुद्रामार्गे हिंद महासागराच्या प्रवासाला निघाली. बुधवारी पुतीन यांनी ती रवाना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.