आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • This Return Is Fortunate... Young People Are Returning To Villages For Agriculture, Avoiding The Lure Of Big Jobs

परिवर्तन:हे परतणे भाग्याचे... मोठ्या नोकऱ्यांचा मोह टाळून शेतीसाठी गावांकडे परतत आहेत तरुण

सेऊल14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊलमध्ये राहणारी २३ वर्षीय किम जी-उन हिने शिक्षणानंतर नोकरीसाठी खूप संघर्ष केला, मात्र दरवेळी निराशा पदरी पडली. राहण्यासाठी घराचीही चिंता होती. आता तिच्या चिंता बदलल्या आहेत. दुष्काळामुळे आपले बटाटे आणि मक्याचे पीक वाया जाईल की काय, अशी भीती तिला आहे. किम आणि तिच्या बहिणीने गेल्या वर्षी नोंसन शहरात शेती सुरू केली. त्यांना सोयाबीनचे पहिलेच उत्पादन मुबलक मिळाले. तेथे पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या तुलनेत सोयाबीनपासून चांगले उत्पन्न मि‌ळाले. किम आणि तिच्यासारखे शेकडो तरुण द. कोरियात क्विचोन मोहिमेत सहभागी आहेत. शहर सोडून गावाकडे येणाऱ्या लोकांशी संबंधित या शब्दाची व्युत्पत्ती एक हजार वर्षांपूर्वी झाली आहे. नोकरी किंवा रोजगाराच्या शोधात शहरात जाणारे लोक आपल्या गावी परत येतात. शेती, पिके आणि त्याच्याशी संबंधित कामांसाठी ते हा पर्याय निवडतात. महामारीने हा पर्याय निवडण्यासाठी त्यांना बाध्य केले. किम आणि तिच्यासारखे अनेक शेतकरी असे आहेत, जे यापूर्वी गावांमध्ये राहिलेले नाहीत. गावांच्या कायापालटाच्या उद्देशाने अशा तरुणांना सरकार प्रोत्साहन देत आहे. तरुणांचे सेऊलचे आकर्षण कमी करणे आणि ग्रामीण जनजीवनाच्या पुनरुज्जीवनासाठी क्विचोनकडे सरकार उपयुक्त पर्याय म्हणून पाहत आहे. सरकारला वाटते, आज गावांमध्ये पोहोचलेले तरुण शेतकरी भविष्यात फायदेशीर ठरणार आहेत. सरकारमान्य बिगिनिंग फार्मर्स सेंटर या संस्थेचे संचालक चोंग क्यू इक सांगतात, की डिजिटल टेक्नॉलॉजीच्या साह्याने सोप्या पद्धतीने होणारी शेती तरुणांना आकर्षित करत आहे. गावांकडे येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ही संस्था गंगनमसारख्या संपन्न भागातील आपल्या केंद्रांमध्ये शेतीचे प्रशिक्षण देते. दक्षिण कोरियाच्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनवर संस्थेच्या ताज्या उत्पादनांना मोठी मागणी आहे.

कोरियन लोकांना फारशी माहिती नसेलेले तंत्र या केंद्रांतून शिकवले जातात. यामध्ये ट्रॅक्टरचा वापर करणे आणि योग्य पिकांची निवड करणे यांचा समावेश आहे. याअंतर्गत या तरुणांना ठरावीक कालावधीसाठी गावांतील अनुभवी शेतकऱ्यांसोबत ठेवून काम शिकवले जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम आणि शेतीशी संबंधित कामांची माहिती शेतकरी त्यांना देतात. चोंग सांगतात की, या प्रशिक्षणामुळे तरुण शेतीकडे वळण्याची शक्यता वाढते. स्थानिक नागरिकांकडून चांगले वर्तन शिकणे हे या प्रशिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तरुणांनी शहरी वर्तनाचा त्याग करावा, असे गावकऱ्यांना वाटते. गावातील राहणीमान कसे असावे याबाबत तरुणांना समजून सांगण्यासाठी गावकऱ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाते. किम सांगते, ‘या भागावर अद्याप काम व्हायचे आहे. कारण तरुणांबाबत गावकऱ्यांमध्ये संकोच आहे. ज्येष्ठ नागरिक येऊन तिला नेहमी सांगतात की, तू हे काम योग्य पद्धतीने करू शकणार नाहीस..., मात्र किम आणि दक्षिण कोरिया सरकारला अपेक्षा आहे की तिची बटाटा आणि मक्याची शेती गावकऱ्यांच्या अंदाज खोटा ठरवेल.

या परतणाऱ्या तरुणांचे वय ४० पेक्षा कमी सरकारचा हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. २०२१ मध्ये ३.८ लाख लोकांनी गावचा रस्ता धरला. हे प्रमाण २०१५ च्या तुलनेत १५ टक्के जास्त आहे. मोठी गोष्ट ही की, त्यातील अर्ध्याहून जास्त जणांचे वय ४० पेक्षा कमी आहे. योनम विद्यापीठातील प्राध्यापक चाई सांग हेन सांगतात,‘दिग्गज कुटुंबाकडून चालवण्यात येणारा व्यवसाय म्हणजेच ऑटो व इलेक्ट्रॉनिक कंपन्यांशी जोडण्यात नव्या पिढीला रस कमीच आहे. हे तरुण जुन्या पिढीच्या पायवाटेवर चलण्यास तयार नाहीत.’

बातम्या आणखी आहेत...