आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात सध्या मधुमेहाचे ५० कोटी रुग्ण आहेत. ही संख्या सातत्याने वाढतच आहे. आतापर्यंत यावर प्रभावी उपचारांचा शोधही लागलेला नाही. मात्र, लवकरच कोट्यवधी लोक या आजारातून मुक्त होणे शक्य आहे. वस्तुत: शरीराने स्वत:हून इन्सुलिनची निर्मिती करावी, अशा तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. यात इंजेक्शनच्या माध्यमातून बाहेरून इन्सुलिन देण्याची गरज नसेल.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मोनाश विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यावर संशोधन करत आहेत. यात त्यांना यशही मिळाले आहे. मात्र, सध्या ते प्राथमिक टप्प्यात आहे. स्वादुपिंड स्टेम पेशींमध्ये इन्सुलिन वेगाने तयार होणाऱ्या प्रक्रियेच्या ते शोधात आहेत. शास्त्रज्ञांनी टाइप-१ मधुमेही रुग्णाने दान केलेल्या स्वादुपिंड पेशींवर संशोधन केले. अद्याप वापर न केलेल्या मधुमेहाच्या एका औषधाचा प्रयोग संशोधनात करण्यात आला.
शास्त्रज्ञांनी या औषधाच्या माध्यमातून स्वादुपिंड स्टेम पेशी पुन्हा सक्रिय करण्यात व ‘इन्सुलिन एक्स्प्रेसिंग’ करण्यात यश मिळवले आहे. इन्सुलिन एक्स्प्रेसिंगने स्वादुपिंडात वेगाने इन्सुलिन तयार होईल. यात टाइप-१ मधुमेहामुळे नष्ट झालेल्या पेशींची जागा नव्या पेशी घेतील व त्या इन्सुलिन बनवतील. मोनाश विद्यापीठातील मधुमेह तज्ज्ञ प्रा. सॅम अल-ओस्ता व डॉ. ईशांत खुराणा यांचे हे संशोधन नेचर नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. साधारणत: एकदा खराब झाल्यास स्वादुपिंड बरा होत नाही. प्रा. अल-ओस्ता सांगतात, टाइप-१ मधुमेह डिटेक्ट होईपर्यंत इन्सुलिन बनणाऱ्या त्याच्या स्वादुपिंड बीटा असलेल्या बहुतांश पेशी नष्ट झालेल्या असतात.
जगभरात प्रत्येकी सहापैकी एक मधुमेही रुग्ण भारताचा
२०१९ मधील आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येकी सहापैकी एक मधुमेही रुग्ण भारताचा आहे. टाइप-१ मधुमेह आनुवंशिक असतो. तो मुले व तरुणांना जास्त प्रभावित करतो. मात्र, याच्या केसेस कमी असतात. टाइप-२ मधुमेह जीवनशैलीशी संबंधित आहे. तो जगभरात वेगाने पसरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.