आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:यंदाची निवडणूक ठरली अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडी, निवडणूक खर्च 54 हजार कोटींवर

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खर्चात डेमोक्रॅटिक पुढे, आतापर्यंत एकूण खर्चात 54 टक्के भागीदारी

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी अखेरचे मतदान ३ नोव्हेंबरला होणार आहे. आतापर्यंत राजकीय पक्षांनी प्रचारावर ५४ हजार कोटी रुपये खर्च केला आहे. ही रक्कम २०१६ मध्ये प्रचारावर झालेल्या खर्चाहून जास्त झाला. म्हणूनच यंदा एकूण खर्च ८८ हजार कोटी रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे. सेंटर फॉर रेस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्सच्या (सीपीआर) सीईआे शीला क्रुमोलज म्हणाल्या, २०१८ च्या मध्यावधी निवडणुकीत विक्रमी निधी पाहायला मिळाला होता. २०२० मध्ये अशा खर्चाची कोणीही कल्पना केली नव्हती. निवडणुकीत एवढा जास्त निधी व खर्च झाल्याने आमच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक ठरली आहे. अंतिम मतदानाला अद्याप २५ दिवस बाकी आहेत. भविष्यातील निवडणुकीचे हे न्यू नॉर्मल आहे का? असा प्रश्न तज्ञांना पडला आहे. सीआरपीच्या आकडेवारीनुसार राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत सुमारे ८८ हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च होईल असा अंदाज आहे.

आतापर्यंत ५४ हजार कोटी रुपये खर्च झाला. हादेखील एक विक्रम आहे. या संस्थेच्या म्हणण्यानुसार ही रक्कम २०१६ मध्ये झालेल्या खर्चाच्या ३६ टक्क्यांहून जास्त आहे. कोरोना विषाणूमुळे मतदार व देणगीदारांच्या भेटी होत नाहीत. सीआरपीच्या मते डिजिटल जाहिरातीच्या माध्यमांतून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. मतदारांना खर्च करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अन्य एका अभ्यासानुसार डिजिटल माध्यमांद्वारे खर्च करण्याच्या बाबतीत बायडेन यांची टीम ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे आहे. बायडेन यांनी सप्टेंबरमध्ये टीव्ही जाहिरातींवर ६८६ कोटी रुपये खर्च केले. ट्रम्प यांनी २९९ कोटी रूपये खर्च केले. सोशल मीडियावरील जाहिरातींवर २३४ कोटी रुपये खर्च केले आहेत. ट्रम्प यांनी १६७ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे ट्रम्प एप्रिलपासून प्रचार करत आहेत आणि बायडेन यांनी सप्टेंबरपासून प्रचाराला सुरुवात केली.

बायडेनवर जनतेकडून तर ट्रम्प यांच्यावर कंपन्यांची उधळण
२०२० च्या निवडणुकीत देणगीदार महिलांची संख्या वाढली आहे. १.७ अब्ज डॉलरची देणगी दिली आहे. २०१६ मध्ये महिलांनी १.३ अब्ज डाॅलर दिले.

१५ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना १९ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. बायडेन यांना ३० कंपन्यांच्या सीईआेंनी ४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

छोट्या देणगीदारांनी बायडेन यांना ६४६२४५११ डॉलरचा निधी े दिला. ट्रम्प यांना या गटाने केवळ १६७८५७११ डॉलरचा निधी मिळाला. २०० डॉलरहून कमी निधीचे दान करणारे लोक २०१६ च्या तुलनेत जास्त महत्त्वाचे ठरले आहेत. काही दात्यांमधील त्यांची भागीदारी २०१६ च्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढून ती २२ टक्क्यांवर पोहोचली.

प्रचार तसेच डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कोनले गुरुवारी रात्री म्हणाले, ट्रम्प शनिवारपासून सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होऊ शकतील. खरे तर त्यांच्या डॉक्टरांचे वक्तव्य चकित करणारे आहे. व्हाइट हाऊस किंवा राष्ट्राध्यक्षांच्या डॉक्टरांनी अद्यापही त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती दिलेली नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser