आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहशतवादाच्या मुद्द्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पाकिस्तान आणि चीनला खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) पहिल्या बैठकीत जयशंकर म्हणाले, की अतिरेकी ओसामा बिन लादेनला आश्रय देणारे आणि भारताच्या संसदेवरील हल्लेखोरांना पाठवणाऱ्यांनी (पाकिस्तान) आम्हाला अजिबात शिकवू नये. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री िबलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उचलल्यामुळे यूएनएससीमध्ये आंतरराष्ट्रीय लादेनला आश्रय देणाऱ्यांनी भारताला... शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चेदरम्यान जयशंकर यांनीे हा प्रहार केला. ते म्हणाले, की जागतिक शांततेच्या प्रयत्नांचे मापदंड ठरलेले आहेत. असे असतानाही जगातील काही देश (पाक आणि चीन) सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. इतकेच नव्हे तर काही देश आंतरराष्ट्रीय व्यसीपाठांचा दुरुपयोगही करत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून अतिरेक्यांना वाचवले जात आहे. जयशंकर म्हणाले की, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना बहुतांश देशांकडून पाठिंबा मिळत आहे. काही देश यात आडकाठी ठरत आहेत. पाकमध्ये असलेला जैशचा म्होरक्या मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी भारताने वळोवेळी संयुक्त राष्ट्रात आणलेल्या प्रस्तावांवर चीननेे व्हेटोचा वापर केला आहे.
सीमेपलीकडूनची कृत्ये आम्ही भोगली, पुन्हा 9/11 मुंबई, 26/11 न्यूयॉर्क होऊ नये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री उशीरा जागतिक दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेदरम्यान सांगितले, की सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवायांचा त्रास भारताने सहन केला आहे. त्यानंतर जग या मुद्द्यावर गंभीर झाले. मुंबई 9/11 आणि न्यूयॉर्क 26/11 सारख्या घटना पुन्हा होऊ नयेत. यासाठी सर्व देशांना दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.