आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:लहानपणापासून वाद्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्यांची बुद्धी वृद्धापकाळातही तल्लख

एडिनबरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या मुलांची बुद्धी दीर्घकाळ तल्लख राहावी असे वाटत असल्यास त्यांना एखादे वाद्य उदाहरणार्थ- पियानाे, तबला किंवा व्हायाेलिन वादनाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करा. मेंदू दीर्घकाळ सक्रिय राहणे आणि वादन यांच्यातील संबंध शाेधण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एडिनबरा विद्यापीठातील संशाेधकांनी हा अभ्यास केला. लहानपणी काेणत्या ना काेणत्या वाद्याचे वादन करणाऱ्या लाेकांचा मेंदू तुलनेने वादन न करणाऱ्यांपेक्षा वृद्धापकाळात अधिक तल्लख राहू शकताे, असे यातून दिसून आले आहे. त्याचबराेबर लहानपणी वादनाचा सराव करणारे लाेक कठीण काळातही सहजासहजी हार मानत नाहीत. त्यांच्या संकटातही याेग्य निर्णय घेण्याची क्षमता असते. सायकाॅलाॅजिकल सायन्समध्ये हा लेख प्रकाशित झाला आहे. संशाेधकांनी वयाची सत्तरी आेलांडलेल्या ३६६ जणांचा अभ्यास केला. त्यापैकी ११७ जणांनी लहानपणी किंवा किशाेरावस्थेत काही ना काही वादनाचा सराव केलेला हाेता. व्हायाेलिन, पियानाे, गिटारवादन यापैकी काहीतरी अनुभव हाेता. अभ्यास प्रकल्पात सहभागींना गणितीय, तार्किक तसेच अध्यात्मिक प्रश्नही विचारले गेले. त्यातून लहानपणी वादन केलेल्यांची मानसिक क्षमता काहीही वादन न केलेल्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आली. तालवाद्यांचे वादन करणाऱ्यांमध्ये तर्कक्षमता तसेच व्यावहारिक शब्दयाेजनादेखील दर्जेदार जाणवली.

वादनातून विचार करण्याच्या क्षमतेत वाढ

नेपियर विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राेफेसर ज्युडिथ ओक्ली निष्कर्षाबद्दल म्हणाले, तुम्ही एखादे मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक काम केल्यास विचारशक्तीत वाढ हाेते. संगीत वाद्यांचे वादन हेदेखील त्यापैकी आहे.

बातम्या आणखी आहेत...