आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतर:अमेरिकेत आश्रयासाठी हजारोंचे महापलायन

मेक्सिको सिटी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मेक्सिकोतील हे छायाचित्र आहे. या भागातून हजारो लोकांचा लोंढा परदेशात स्थलांतरित होत आहे. त्यापैकी बहुतांश मध्य अमेरिका, क्युबा, व्हेनेझुएला तसेच हैतीमधील नागरिक आहेत. हे लोक गरिबी, गुन्हेगारी, अस्थिरतेने पीडित आहेत. या नागरिकांना चांगल्या जीवनाचा शोध आहे. त्यामुळेच त्यांना अमेरिकेत आश्रय मिळावा अशी अपेक्षा आहे. येथून १६०० किमी अंतरावरील अमेरिकन सीमेपर्यंत जाण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पुढच्या टप्प्यावर हा लोंढा आणखी महाकाय होऊ शकतो. कारण होंडुरास तसेच इतर देशांतील लोकही वाटेत सामील होतील. या वेळी मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांना रोखलेले नाही. स्थलांतरितांच्या गर्दीने तपचुलाहून सुमारे ५० मैलावर हुइक्स्टलाचा भाग आेलांडला होता. त्यात चार ते पाच हजार लोक सामील होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्यात सहा हजारांहून जास्त लोक सहभागी आहेत. नागरिकांचे लांबच लांब जथ्थे जाण्याची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. याआधी अमेरिकेला जाण्यासाठी लहान लोंढे निघायचे. परंतु नंतर अनेक हजार स्थलांतरास सुरुवात झाली.

17 लाख लोकांची २०२१ मध्ये अमेरिका व मेक्सिकोत धरपकड 1.5 लाख लोकांचा मेक्सिकोत आश्रयासाठी अर्ज

बातम्या आणखी आहेत...