आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Thousands In Danger; Whether It Is A School Or A Stadium, Not Only That, People Are Being Killed At Birth; News And Live Updates

अफगाणिस्तान:​​​​​​​हजारा जमात धोक्यात; शाळा असो की क्रीडांगण, एवढेच नव्हे तर जन्माच्या वेळी मारले जात आहेत लोक

काबूल2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सन 2015 नंतर आजपर्यंत सुमारे 1200 हजारा लोक मारले गेले

अफगाणिस्तानच्या ३.६० कोटी लोकसंख्येत हजारा समुदायाचा वाटा ९% अाहे. मात्र, या अल्पसंख्याकांना संरक्षण मिळण्याऐवजी या समुदायातील लोक अतिरेक्यांच्या हातातून बलिदान देत आहेत. एवढेच नव्हे तर जन्माच्या वेळीही या समुदायातील मुलांना मारले जात आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील मानवाधिकार संघटना आहे, ‘ह्यूमन राइट्स अँड इरॅडिकेशन ऑफ व्हाॅयलन्स.’ तिचे कार्यकारी संचालक वदूद पेद्रम यांच्यानुसार २०१५ नंतर अतिरेकी हल्ल्यात कमीत कमी १२०० हजारा लोक मारले गेले आहेत.

शाळा, लग्न, मशिदी, क्रीडांगणे, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर हल्ले होत आहेत. ते म्हणतात, गेल्या वर्षी अतिरेक्यांनी एका प्रसूती रुग्णालयावर हल्ला केला. यात हजारा समुदायाचे नवजात शिशू आणि त्यांच्या मातांसह २४ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यातच या भागातील सय्यद अल शहादा शाळेत तिहेरी बॉम्बस्फोट झाला. यात जवळपास १०० लोक मारले गेले होते. त्यात बहुतांशी हजारा जमातीच्या विद्यार्थिनी होत्या.

पेद्रम यांच्या म्हणण्याला घडलेल्या घटनांनी दुजोरा दिला. गेल्या आठवड्यातच हजारा समुदायाच्या आदिला खियारी आणि त्यांच्या दोन मुली होस्निया आणि मीना खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. काही वेळाने एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यात होस्निया गंभीर जखमी झाली, तर आई व मीना यांचा जीव गेला. नंतर होस्नियाचाही मृत्यू झाला. काबूलमध्ये गेल्या ४८ तासांत ही चौथी बस होती, जी बॉम्बने उडवण्यात आली होती. या स्फोटात १८ जण मारले गेले होते.

सरकार भेदभाव करत असल्याचा हजारा समुदायाचा आरोप
येथे बहुतांश हजारा शिया मुसलमान आहेत. म्हणून ते मुस्लिम कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या समुदायाचे प्रमुख कतरदुल्लाह ब्रोमन सांगतात, सरकारला आमची काळजी नाही. आमच्या लोकांचे भवितव्य अंधारात आहे.