आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Thousands Of Young People In Afghanistan Are Returning To The Path Of Education Without Fear Of Suicide Attacks News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:शिक्षणाच्या मार्गावर परत येत आहेत अफगाणिस्तानातील हजारा समुदायातील तरुण, आत्मघाती हल्ल्याची भीतीही सतावत नाही

काबूल21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबान व आयएस अतिरेक्यांच्या निशाण्यावर राहिलेत हजारो लोक, आता स्थिती बदलत आहे

अडीच वर्षांपूर्वी एका आत्मघाती हल्लेखोराने मावूद अकॅडमी ट्यूशन सेंटरमध्ये स्फोट केला. त्यात सुमारे ४० विद्यार्थी मारले गेले होते. ते सर्व अल्पसंख्याक हजारा समुदायातील हाते. ते महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागले होते, तर नाजीबुल्लाह युसेफी (३८) नावाचे शिक्षक ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या अशाच एका स्फोटात बचावले होते. अाता ते त्यांच्या विद्यार्थ्यांसह नवीन ठिकाणी गेले आहेत. पुढील स्फोटासाठी त्यांच्याकडे योजनाही आहे. ते म्हणतात, मी माझ्या वर्गात आहे आणि मारलाही जाऊ शकतो. मात्र या वेळी मी माझ्या मुलांना वाचवण्यासाठी हल्लेखोराला भेटी मारेन, म्हणजे स्फोट करणार नाही.

आतापर्यंत अफगाणिस्तानात सर्वाधिक हिंसाचार हजारा समुदायाने सहन केला आहे. मात्र आता स्थिती बदलत आहे. तालिबानच्या भीतीचे सावट कमी झाल्याने या समुदायातील तरुण महाविद्यालयात परतू लागले आहेत. भीती दूर सारत त्यांच्या डोळ्यांत आपल्या देशातच राहून उच्च शिक्षण मिळवण्याचे स्वप्न आहे. १८ वर्षांची विद्यार्थिनी मर्जिया मोहसेनी म्हणते, जर तालिबानची सत्ता आली तर तिला तिच्या शिक्षणाचा हक्क हिरावला जाण्याची भीती आहे. मात्र लष्कराने तिला सुरक्षेचा विश्वास दिला आहे.

देशातील सर्वांना त्यांचे हक्क मिळून देण्यात मदत करता यावी म्हणून मर्जियाला वकील व्हायचे आहे. बहुतांश हजारा विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. १५ डॉलर (जवळपास १ हजार रुपये) महिन्याच्या वसतिगृहात राहतात. यातील अनेक जण शिक्षण घेणारे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच आहेत. सर्वांना पदवी मिळवून नोकरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत वर्तमानात बदल करण्याची आशा आहे.

पश्तून श्रीमंतांनी छळलेले शिया मुस्लिम आहेत हजारा समुदायाचे लोक
अफगाणिस्तानातील ३.५ कोटी लोकसंख्येत हजारा समुदाय फक्त १० ते २० टक्के आहे. ते मुख्यत्वे शिया मुस्लिम आहेत आणि १९ व्या शतकाच्या अखेरीस अफगाणिस्तानच्या पश्तून श्रीमंतांनी छळलेले आहेत. हजारा लोक मागील काही वर्षांत ट्यूशन सेंटर, मशिदी, रुग्णालये आणि मतदान केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांचे सर्वाधिक बळी ठरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...