आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाेर्ब्ज:आशियातील सर्वात मोठ्या दानशूरांच्या यादीत अदानी; विधायक कामांवर 60 हजार काेटी रुपये खर्च करणार

सिंगापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्ब्जने यावर्षीच्या आशियातील सर्वात मोठ्या दानशूरांच्या यादीत भारतातील गौतम अदानी, शिव नादर आणि अशोक सूता यांचा समावेश केला आहे. अदानींनी या वर्षी जूनमध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल ६०,००० कोटी रुपये सामाजिक कार्यावर खर्च करण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले होते. हा पैसा आरोग्य, शिक्षण व काैशल्य विकासावर खर्च होत आहे. मलेशियात राहणारे भारतवंशीय व्यावसायिक ब्रह्मल वासुदेवन व त्यांच्या वकील पत्नी शांती कंडिया यादेखील आशियातील दानशूरांच्या यादीत आहेत.

शिव नादर : यावर्षी ११,६०० कोटींचे दान कोणतीही रँकिंग नसलेल्या यादीमध्ये एचसीएल कंपनीचे शिव नादर (७०) यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. नादर यांनी या वर्षी ११,६०० कोटी रुपये दान केले आहेत. या रकमेतून शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती केली जात आहे.

अशोक सूता : संशोधनासाठी दिले ६०० कोटी रु. हॅप्पिएस्ट माइंड्सचे कार्यकारी अध्यक्ष अशोक सूता (८०) यांनी वैद्यकीय संशोधनासाठी ट्रस्टला ६०० कोटी रुपये दान दिले आहेत. या ट्रस्टची स्थापना त्यांनी २०२१ मध्ये केली होती.

बातम्या आणखी आहेत...