आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तिबेटी बौद्ध भिक्खू सांगतील अंतराळातील सुखद सफारीच्या युक्त्या

मॉस्को13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दलाई लामांच्या मंजुरीनंतर 100 बौद्ध भिक्खूंवर अभ्यास करताहेत रशियन अंतराळशास्त्रज्ञ

रशियाचे अंतराळ वैज्ञानिक सध्या तिबेटी बौद्ध भिक्खूंच्या शरणात आहेत; मात्र मन:शांतीसाठी नव्हे तर त्यांचे तंत्र शिकण्यासाठी. भिक्खू कित्येक आठवडे कसे अर्ध सुप्तावस्थेत राहू शकतात, गहन ध्यानाच्या स्थितीत कसे जातात आणि कोणत्या प्रकारे सामान्य अवस्थेत परततात, याचा ते वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. त्यांचे हे प्राचीन पद्धतींचे ज्ञान भविष्यात दीर्घ पल्ल्याच्या अंतराळमोहिमांत अंतराळवीरांना कामी येणार आहे.

मॉस्को स्टेट विद्यापीठाचे वैज्ञानिक १९९ तिबेटी भिक्खूंवर हे अध्ययन करत आहेत. लांब पल्ल्याच्या अंतराळमोहिमेचे प्रमुख आणि मार्स-५०० मोहिमेचे नेतृत्व करत असलेले प्रो. युरी बबयेव यांच्यानुसार, भिक्खूंद्वारे शीतनिद्रेची स्थिती मंगळसारख्या मोहिमेत महत्त्वाची ठरू शकते. प्रो. बबयेव यांची टीम खासकरून ‘टुकडम’सारख्या (मरणोत्तर ध्यान) दाव्यांचे अध्ययन करत आहे. त्यात भिक्खूंना वैद्यकीयरीत्या मृत घोषित केले जाते. तरीही ते कित्येक आठवडे क्षय झाल्याविना ताठ बसलेले असतात. म्हणजे इतक्या दिवसांनंतरही त्यांच्या शरीरात मृतदेहासारखी दुर्गंधी व इतर लक्षणे दिसत नाही. चेतनेच्या बदललेल्या अवस्थांचा वापर आमच्यासाठी खूप कामाचा आहे. कारण, त्याच्या मदतीने चयापचयाचा वेग बदलता येऊ शकतो. कित्येक तासांचे ध्यान, एकांतवास व मंत्रोच्चाराद्वारे या अवस्थेपर्यंत पोहोचता येते. त्यातून प्रगाढ एकाग्रता सिद्ध होते. प्रो. बबयेव म्हणाले, दलाई लामांच्या परवानगीनंतरच अध्ययन सुरू केले. मात्र कोरोनामुळे त्याला काहीसा विलंब झाला.रशियन अंतराळ वैज्ञानिकांनुसार, तिबेटी भिख्खूंच्या पद्धती व तंत्राचा वापर दीर्घ काळापर्यंच्या अंतराळ प्रवासासाठी वरदान ठरू शकतो. प्रो. बबयेवनुसार, या पद्धती शरीराचे जास्त नुकसान केल्याविना लोकांचे अंतराळ प्रवासाचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

अंतराळवीरांना कमी थकवा येईल, आपसात संघर्षही होणार नाही
गहन ध्यानावस्थेत भिक्खूंच्या मेंदूत काेणत्या प्रकारच्या विद्युत हालचाली होत आहे, हेही वैज्ञानिकांची टीम तपासत आहे. संशोधकांनुसार, गहन ध्यानामुळे मेंदू बाहेरील घडामोडींपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकते. सध्या ही टीम नासासोबत एकत्र येऊन स्पेस फ्लाइटच्या दरम्यान ‘प्रगाढ निद्रे’च्या पर्यायावर संशोधन करत आहे. या स्थितीत चयापचय थांबल्याने विकिरण प्रतिरोधक क्षमता वाढेल. स्पेसक्राफ्टच्या तंग जागेत घर्षणाची शक्यताही कमी होईल. प्रवाशांना कमी थकवा जाणवेल व लांब पल्ल्याच्या मोहिमेत त्यांच्यात संघर्षाची स्थितीही उद्भवणार नाही.

बातम्या आणखी आहेत...