आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Tick Borne SFTS Virus Re Emerges In China :60 People Infected, 7 Killed; Latest Updates Tick Borne SFTS Virus

चीनमध्ये नवीन व्हायरस:कोळीसारख्या किटकापासून पसरतो बुन्या व्हायरस, चीनमध्ये आतापर्यंत 60 लोक संक्रमित, 7 जणांचा मृत्यू; रुग्णांमध्ये ताप-खोकल्यासारखी लक्षणे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संक्रमित रुग्णांना एका महिन्याच्या उपचारानंतर डिस्चार्ज दिला जात आहे

चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा संसर्ग पसरत आहे. याचे नाव SFTS आहे. याला बुन्या व्हायरस नावाने देखील ओळखले जाते. हा व्हायरस कोळी सारख्या दिसणारा 'टिक' या किड्याच्या चावण्यामुळे पसरतो. चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 60 लोक संक्रमित झाले आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. चीन मीडियानुसार गेल्या 6 महिन्यांपूर्वी पूर्व चीनच्या जिआंगसु प्रांतातील 37 लोकांना SFTS व्हायरसचा संसर्ग झाला होता. यानंतर पूर्व चीनच्या अनहुई प्रांतात 23 लोकांना याची लागण झाली होती.

रुग्णांमधील ल्यूकोसाइट आणि रक्त प्लेटलेट्स कमी झाल्या

जिआंगसुची राजधानी नानजिंग येथील एक महिला या व्हायरसमुळे संक्रमित झाली. तिच्यात ताप आणि खोकल्यासारखी लक्षणे दिसली. तिच्या शरीरात ल्यूकोसाइट आणि ब्लड प्लेटलेट्सची कमतरता दिसली. एका महिन्याच्या उपचारानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

रुग्णांचे रक्त आणि घामामुळे संसर्गाचा धोका

झेजियांग विद्यापीठाच्या रुग्णालयातील डॉ. शेंग जिफांग म्हणाले की, या व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरतो. संक्रमित रुग्णाच्या रक्त आणि घामामुळे SFTS व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. तज्ञ म्हणतात की काळजी करण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे.

SFTS व्हायरस नवीन नाही

चिनी मीडियानुसार SFTS व्हायरस नवीन नाही. 2011 मध्ये शास्त्रज्ञांनी या व्हायरसला वेगळे केले होते. एसएफटीएस बुन्या व्हायरसच्या (Bunyavirus) प्रवर्गातील आहे.

बुन्या व्हायरसबाबत 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरे

1. काय आहे का व्हायरस?

हा व्हायरस सिव्हीअर फीव्हर विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमचे कारण आहे. यामुळे याचे नाव SFTS व्हायरस आहे. बुन्या प्रकारातील असल्याचे याला बुन्या व्हायरस देखील म्हणतात.

2. व्हायरसचा प्रसार कसा होतो?

बुन्या व्हायरस वाहक (कॅरियर) कोळी सारखा एक कीटक 'टिक' आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला टिक चावतो तेव्हा संसर्ग पसरतो.

3. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग कसा होतो?

चीनी तज्ञांच्या मते, हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्ताने आणि घामातून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो.

4. याची लक्षणे काय आहेत?

ताप येणे, प्लेटलेट्स आणि ल्यूकोसाइट वेगाने कमी होणे मुख्य लक्षणे आहेत.

5. मृत्युचा धोका किती?

चीनची आरोग्य संस्था सीडीसीनुसार, या व्हायरसमुळे मृत्युचा धोका 12% पर्यंत आहे.

6. याची लस आहे का?

अद्याप या व्हायरसची कोणतीही लस तयार करण्यात आली नाही.

7. संरक्षण कसे करावे?

संक्रमित लोकांपासून दूर राहा, जंगल आणि झुडुपे भागात जाऊ नका. या भागात सर्वाधिक टिक आढळतात.

बातम्या आणखी आहेत...