आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टिकटॉकचे बाथरूम चॅलेंज अमेरिकी शाळांसाठी ठरतेय डोकेदुखी; मुले फायर अलार्म, आरसा, टाइल्सही चोरताहेत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका महिन्यात 94 हजारांहून अधिक वेळा व्हिडिओ शेअर, मुलांचा उन्माद थांबेना

अमेरिकी शाळांतील स्वच्छतागृहांतून सध्या फायर अलार्म, सोप डिस्पेन्सर, पेपर नॅपकिन, बाथरूम मिरर, सॅनिटायझर गायब होत आहे. एवढेच नव्हे तर काही शाळांमधून शिक्षकांचे डेस्कही चाेरून नेले आहेत. खूप प्रयत्न करूनही शिक्षक आणि शाळा या चोऱ्या रोखू शकल्या नाहीत. या वस्तू कोण आणि कोठे घेऊन जात आहे हे कोणालाच माहीत नाही. परंतु टिकटॉकवर शेअर व्हिडिओवर या वस्तू बघायला मिळतील. हा उन्माद टिकटॉक व्हिडिओपासूनच सुरू झाला आहे. या उपद्रवाला ‘बाथरूम चॅलेंज’ असे म्हटले जात आहे. हे व्हिडिओ #deviouslicks सोबत शेअर केले जात आहेत. गेल्या १ सप्टेंबर रोजी टिकटॉक युजरने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने शाळेतून चोरलेला डिस्पोजेबल मास्कचा बॉक्स आपल्या बॅगेत ठेवला होता. हा व्हिडिओ २.३९ लाख वेळा बघितला गेला. काही दिवसांनंतर याच हॅशटॅगसह शाळेतून सॅनिटायझर चोरीचा व्हिडिओही शेअर केला गेला. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे.

प्लॅटफॉर्मवर महिनाभरात ९४ हजारांहून अधिक व्हिडिओ अपलोड आहेत. या हॅशटॅगने विद्यार्थ्यांना मोठमोठ्या चोऱ्यांसाठी प्रोत्साहित केले आहे. काही शाळांमधून स्वच्छतागृहाच्या टाइल्स, हँडरेल आणि पार्टिशनसारख्या वस्तूही उखडून नेण्यात आल्या. फ्लोरिडाच्या पॉस्को काउंटीतील १० शाळांमध्ये तर खुर्च्यांचे पाय तोडून त्या बाथरूममध्ये फेकल्या आहेत. महामारीनंतर अडचणींचा सामना करत शाळा उघडण्याची जोखीम पत्करणाऱ्या शाळांचे संचालक या नव्या आव्हानामुळे त्रस्त झाले आहेत. आधीच शैक्षणिक नुकसान, कोरोनाचे वाढते रुग्ण या समस्यांसोबतच त्यांना ‘बाथरूम चॅलेंज’चाही सामना करावा लागत आहे.

शाळांची आता शिक्षा देण्याची आणि दंडवसुलीची तयारी
कॅलिफोर्नियापासून जॉर्जियापर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांवर सक्तीने निलंबन, गुन्हा दाखल करणे आणि भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, तर काही शाळांनी वर्ग सुरू असताना स्वच्छतागृहे कुलूपबंद करणे सुरू केले आहे. सॅन एंटोनियोमध्ये शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून दंडाद्वारे भरपाई करून घेतली जात आहे. जिल्हा प्रवक्ता ऑब्रे चान्सलर म्हणाले, आमचा उद्देश पैसे वसूल करणे नसून विद्यार्थ्यांना त्यांची चूक दाखवून देणे आहे.

बातम्या आणखी आहेत...