आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगिरी:ॲपलमध्ये 10 वर्षांपासून जबाबदारी सांभाळणारे टिम कुक यशस्वी सीईओ

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ॲपलमध्ये १० वर्षे सीईओ राहिलेले टिम कुक यांनी यशाची नवी कथा लिहिली आहे. मायक्रोसाॅफ्टचे बिल गेट्स यांना यशाच्या शिखरावर नेणारे स्टीव्ह बॉल्मर आणि डेल यांना ओळख मिळवून देणारे केविन रॉलिन्स यांच्याप्रमाणेच टिम कुक यांनी त्यांच्या एका दशकाच्या कार्यकाळात ॲपलला २ ट्रिलियन म्हणजे १४८ लाख कोटी रुपये मूल्य असलेली सर्वात मौल्यवान कंपनी बनवण्यात मदत केली. सध्या कंपनीचे बाजारमूल्य १९०.१८ लाख कोटी रुपये आहे. त्यांना आतापर्यंतचे सर्वात यशस्वी सीईओ म्हटले जात आहे. जगातील कोणत्याही कंपनीच्या सीईओने त्यांच्यासारखी श्रेष्ठ कामगिरी केली नाही. एवढेच नव्हे तर उत्पन्नाच्या बाबतीतही त्यांनी ॲमेझॉनचे सीईओ राहिलेले जेफ बेजोस आणि वॉरेन बफे यांनाही मागे टाकले. त्यांची संपत्तीही १ अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. त्यांचे वेतन २०२०-२०२१ मध्ये २६५ मिलियन डॉलर होते.

ॲपलमध्ये १० वर्षे सीईओ राहिलेले टिम कुक यांनी यशाची नवी कथा लिहिली आहे. मायक्रोसाॅफ्टचे बिल गेट्स यांना यशाच्या शिखरावर नेणारे स्टीव्ह बॉल्मर आणि डेल यांना ओळख मिळवून देणारे केविन रॉलिन्स यांच्याप्रमाणेच टिम कुक यांनी त्यांच्या एका दशकाच्या कार्यकाळात अॅपलला २ ट्रिलियन म्हणजे १४८ लाख कोटी रुपये मूल्य असलेली सर्वात मौल्यवान कंपनी बनवण्यात मदत केली. सध्या कंपनीचे बाजारमूल्य १९०.१८ लाख कोटी रुपये आहे. त्यांना आतापर्यंतचे सर्वात यशस्वी सीईओ म्हटले जात आहे. जगातील कोणत्याही कंपनीच्या सीईओने त्यांच्यासारखी श्रेष्ठ कामगिरी केली नाही. एवढेच नव्हे तर उत्पन्नाच्या बाबतीतही त्यांनी ॲमेझॉनचे सीईओ राहिलेले जेफ बेजोस आणि वॉरेन बफे यांनाही मागे टाकले. त्यांची संपत्तीही १ अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. त्यांचे वेतन २०२०-२०२१ मध्ये २६५ मिलियन डॉलर होते.

कंपनीबाबत समर्पण, विस्तार व ती पूर्ण संयमाने चालवण्यासाठी नियमित नव्या कल्पनांनी त्यांना या शिखरापर्यंत नेले. खुद्द टिम कुक म्हणतात, जे स्टीव्ह जॉब्सने केले, मी नेहमीच त्याच्या उलट करण्याचे प्रयत्न केले आणि मला यश मिळत गेले. ॲपलवर दीर्घकाळ लक्ष ठेवून असलेले हॉरेस डेडियू सांगतात, स्टीव्ह जॉब्स आणि कुक यांच्यात मोठा फरक आहे. जॉब्सना ब्रह्मांडात राज्य करायचे आहे, तर टिम कुक यांना जगाला चांगले ठिकाण करायचे आहे. मग कुक त्यांच्यापासून प्रेरित झाले नसले तरी त्यांनी केलेले बदल अॅपलसाठी लाभदायक ठरले आहेत. त्यांच्या यशात एक धडा आहे की, टेक फर्मना आपल्या संस्थापकाची कार्बन कॉपी शोधण्याची गरज नाही.

बातम्या आणखी आहेत...