आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नकारात्मकता घालवण्यासाठी, लैंगिक समानतेसाठी स्पेनमध्ये विद्यार्थ्यांना स्वयंपाक, झाडलाेट करण्याचे धडे

विगाे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेनाची स्थिती निवळली, सहा महिन्यांनंतर शाळा सुरू, आधी मुले राहायची नाराज

स्पेनमधील एका शाळेत मुलांना स्वयंपाक करणे, भांडी घासणे, झाडलाेट इत्यादीचे शिक्षण देत आहे. त्यामागे दाेन कारणे आहेत. दीर्घकाळानंतर शाळेत आलेल्या व हिरमुसलेल्या मुलांमधील नकारात्मकता संपवणे हे त्यामागील एक कारण. लैंगिक समानता वाढवण्याचाही त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. विगाे सिटीमधील डे फिमेंटाे माँटेकास्टेलाे शाळेतील या उपक्रमाचे काैतुक केले जात आहे.

शाळेचे संस्थापक डॅन बेकन म्हणाले, शहराची लाेकसंख्या ३ लाखांवर आहे. काेराेना संसर्ग वाढल्याने विगाे सिटीसह संपूर्ण देशातील शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. या काळात विद्यार्थ्यांना अनेक दिवस घरातच राहावे लागले. यातून बहुतेक मुलांची मानसिक स्थिती बिघडली. काही मुले नैराश्यात गेली. काही मुलांच्या मनात नकारात्मकता निर्माण झाली. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू झाल्या. सहा महिन्यांनंतर शाळा गजबजल्या. परंतु बहुतांश मुले हिरमुसल्यासारखी वागत हाेती. शाळा व्यवस्थापनाला ही बाब लक्षात आली. त्यांनी विद्यार्थ्यांमधील नकारात्मकता संपवण्याचे ठरवले. त्यानंतरच अभ्यास घेण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी बाॅइज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घरकामे शिकवण्यात आली.

मुलांनीदेखील घरकामात रस दाखवला. त्यांच्यातील नकारात्मकता संपत गेली. ते परस्परांना बाेलू लागली. शाळेच्या शिक्षिका डॅनियल कार्ला म्हणाल्या, सामान्यपणे घरकामासाठी महिलांचा झगडावे लागते. घरात मुलगा व मुलगी असल्यास केवळ मुलगीच घरकामात लक्ष घालते. बहुतांश मुले घरकामात लक्ष घालत नाहीत. आईला मदत करण्यासाठी त्यांना प्रेरित केले जात नाही. त्याचबराेबर लैंगिक समानतेच्या दृष्टीनेदेखील हे पाऊल महत्त्वाचे आहे. सध्या १०० हून जास्त मुले शाळेत येऊ लागली आहेत. त्यांना घरगुती कामांबराेबरच त्यांच्या जबाबदारीविषयीदेखील शिकवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...