आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जबाजारी झालेल्या श्रीलंकेला नव्या हंगामासाठी लवकरच युरियाचा पुरवठा केला जाईल. त्याचबरोबर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून अन्नधान्यही पाठवले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवश्यक असलेले खत पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. आगामी वीस दिवसांत ते श्रीलंकेला मिळेल, अशी माहिती
राष्ट्रपती राजपक्षे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात भारताने श्रीलंकेला तत्काळ ६५ हजार टन युरिया पाठवणार असल्याचे स्पष्ट केले होते. श्रीलंकेने आता देशाच्या कृषी क्षेत्रावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील २० लाखांवर शेतकरी व ७० टक्के लाेकसंख्या शेतीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाेडलेली आहे. देशात अराजकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनता रस्त्यावर आंदोलन करत आहे. त्यामुळे तणाव आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.