आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालवयात दयाळू गुणवैशिष्ट्ये विकसित व्हावीत यासाठी ब्रिटनमध्ये सामाजिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. लहान वयात मुलांवर दयाभावाचे संस्कार केल्यास त्याचा भावी नागरिक म्हणून समाजास मोठा उपयोग ठरू शकतो. ही गरज लक्षात घेऊन सध्या ब्रिटनच्या शाळांमध्ये मुलांना दयाळू बनवण्यासाठी “सामाजिक चळवळ’ राबवली जात आहे. मुलांमध्ये सामाजिक शक्तीची जाणीव करून दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये दयाळूपणा शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनत आहे. या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे लहान मुलांमध्ये दयाभाव विकसित होईल. साधारण ३० हजारांहून अधिक शाळांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
काइंडनेस यूके संस्थेने शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाला ५० हजारांहून जास्त दयाळूपणा किट वाटप केल्या आहेत. किटमध्ये मुलांना दयाभाव शिकवण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आखला आहे. त्यात दयाळूपणावरील चर्चेपासून विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. ब्रिटिश रेड क्रॉस सोसायटीही शिक्षक आणि मुलांना दयाळूपणाच्या शक्तीचा परिचय घडवून आणत आहेत. काइंडनेस यूकेचे सीईओ डेव्हिड जॅमिली यांनी दै. भास्करला सांगितले की, दयाभाव आणि परोपकार याचा भारतीय संस्कृतीत आधीपासूनच समावेश आहे. भारत शालेय अभ्यासक्रमात औपचारिकरीत्या दयाळूपणाचा समावेश करून जगात एक आदर्श उदाहरण समोर आणू शकतो. देशाची विशाल लोकसंख्या दयाभाव पसरवण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावू शकते. याचे कारण म्हणजे, अनेक प्रस्थापित आणि उभरते देश भारताकडे नेतृत्वाच्या रूपात पाहत आहेत.
लॉर्न्सहिल अकॅडमीच्या शिक्षिका मॅकिनटोस यांनी सांगितले की, हा एक उत्कृष्ट नवोन्मेष आहे. आपण शाळांमध्ये दयाळू सप्ताह साजरा करतो. दयाळूपणाचा मुलांच्या वेळापत्रकांत समावेश केला आहे. मुलांची दयाळूपणा समिती स्थापन केली आहे. प्रत्येक दयाळू समूह आपल्या स्रोतांचा वापर करून पैसा जमा करतो. मुलांना आठवड्यात दयाळूपणाची ५ कामे असाइनमेंट म्हणून दिली जातात. चांगल्या कामाने जगात बदल घडवू शकतो, असा विश्वास त्यांच्यात निर्माण होत आहे.
सर्व्हे : दयाभाव घटतोय
ससेक्स युनिव्हर्सिटीने ६० हजार नागरिकांवर नुकताच दयाळूपणाबाबत सर्वात मोठा अभ्यास केला आहे. मानसशास्त्रज्ञ प्रा. रॉबिन बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास झाला. डॉ.रॉबिन यांच्यानुसार, महिला जास्त दयाळू असतात. उत्पन्न, संपन्नता दयाभाव गुणावर परिणाम करत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.