आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympics Coach Proposed To The Argentine Athlete In Front Of The Camera Said Say Yes Everyone Is Watching; News And Live Updates

साऱ्या जगासमोर लग्नाची मागणी:अर्जेन्टिनाच्या खेळाडूला तिच्याच कोचने ऑन कॅमेरा केले प्रपोज; 11 वर्षांपूर्वी दिला होता नकार, आता म्हणाली...

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 वर्षांपूर्वीदेखील केले होते प्रपोज

टोकियो ऑलिम्पिकची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु, आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक आश्चर्यचकीत अशी घटना घडली आहे. अर्जेन्टिनाच्या तलवारबाज मारिया बेलेन हीचे कोच लुकास सॉसेडोने ऑन कॅमेरा प्रपोज केले आहे. दरम्यान, ते म्हणाले की लवकर हो म्हणं सगळेजण आपल्याला पाहत आहे. हे पाहून सगळेजन आवाक झाले होते.

अशी घडली घडना?
मारिया पहिल्या फेरीतच पराभूत झाल्यानंतर पदकांच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. त्यानंतर ती एका टीव्ही मुलाखतीत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. त्यावेळी मारिया खूप निराश दिसत होती. दरम्यान, तीचे कोच लुकास सॉसेडोन तिथे आले आणि त्याच्या हातात एक कागद होते. ज्यावर लिहिले होते की, "तु माझ्याशी लग्न करशील का?" गुडघ्यांवर बसून कोचने मारियाला प्रपोज केले असून मारियाने देखील त्यांचे प्रपोज स्वीकारले आहे.

11 वर्षांपूर्वीदेखील केले होते प्रपोज
मारिया आणि सोसेडो गेल्या 17 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सोसेडोने 2010 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान मारियाला पहिल्यांदा प्रप्रोज केले होते. तेंव्हा मारियाने नकार देत हा जोक आहे की काय असे म्हटले होते. परंतु, आता तीने ते मान्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...