आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Tokyo Olympics Opening Ceremony Live Indian Team March Past Will Be At Number 21 Athletes From 205 Countries Are Participating​​​​​​​; News And Live Updates

टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा:कोरोनाच्या सावटाखाली 32 व्या ऑलिम्पिक स्पर्धेला झाली सुरुवात; जगातील 350 कोटी लोकांनी पाहिला उद्घाटन सोहळा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1896 मध्ये झाली मार्चपास्टची सुरुवात

कोरोना महामारीमुळे एक वर्ष उशीरा होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी पार पडला. 32 वी ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. सामान्यत: ऑलिम्पिकमध्ये सर्व देशांमधील खेळाडूंचा सलामीचा कार्यक्रम आणि मार्च पास्ट हा मुख्य आकर्षणचा विषय असतो. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे यंदा 1 हजार खेळाडू आणि अधिकारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अंदाजानुसार, जगभरातील सुमारे 350 कोटी लोक हा उदघाटन सोहळा पाहत आहे. लोक टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप सारख्या उपकरणांवर हा कार्यक्रम पाहत असल्याचे समितीने म्हटले आहे.

हा निर्वासित खेळाडूंच्या संघाचा मार्च पास्ट असून यावेळी 29 शरणार्थी खेळाडू 12 खेळामध्ये भाग घेत आहेत.
हा निर्वासित खेळाडूंच्या संघाचा मार्च पास्ट असून यावेळी 29 शरणार्थी खेळाडू 12 खेळामध्ये भाग घेत आहेत.

1896 मध्ये झाली मार्चपास्टची सुरुवात
ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या मार्च पास्टची सुरुवात 1896 मध्ये ग्रीस सैन्याच्या पथकाव्दारे करण्यात आली. त्यानंतर निर्वासित खेळाडूंच्या मार्च पास्ट झाला होता. खेळाडूंच्या मार्च पास्टमध्ये भारतीय संघ 21 व्या स्थानावर आला. भारतीय पथकाच्या मार्च पास्टमध्ये खेळाडू आणि अधिकारी यांच्यासह 25 सदस्यांनी भाग घेतला.

टोकियो ऑलिम्पिकचा विरोधी करताना निदर्शक
टोकियो ऑलिम्पिकचा विरोधी करताना निदर्शक

11,238 खेळाडूंनी घेतला सहभाग
टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या स्पर्धेत 11 हजार 238 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यावेळी ऑलिम्पिमध्ये 33 क्रिडा प्रकारात 339 सुवर्ण आहेत. उद्घाटन समारंभात जपानचा सम्राट नरुहिटोसुद्धा हजर होता. यावेळी शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणार्‍या बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांना विशेष ऑलिम्पिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कोरोनामुळे मरण पावलेल्यांना श्रद्धाजंली देण्यात आली.
यावेळी कोरोनामुळे मरण पावलेल्यांना श्रद्धाजंली देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...