आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात 4-5 मित्र असणे चांगले:जास्त मित्र नकारात्मकता निर्माण करू शकतात, सर्वात जवळचा मित्र असणे गरजेचे नाही

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात किती मित्र गरजेचे असतात? यावर तुम्ही कधी विचार केला नसावा. परंतु अलीकडेच प्रकाशित पुस्तकातून जास्त मित्र असणे चांगली गाेष्ट नसल्याचे म्हटले आहे. साेशल मीडियाच्या काळात जास्त मित्रांचे नेटवर्क ही सामान्य बाब आहे. मात्र ब्रिटनच्या प्रसिद्ध लेखिका व रिलेशनशिप तज्ज्ञ एलिझाबेथ डे म्हणाल्या, खूप जास्त जवळचे मित्र असल्याचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकताे. लाेकांनी तुम्ही कमी गंभीर आहात, असे वाटू लागते. एलिझाबेथ यांनी फ्रेंडहाॅलिकमध्ये चांगल्या मानसिक आराेग्यासाठी चार ते पाच मित्र असणे चांगले म्हटले आहे. त्यापेक्षा जास्त असल्यास फायदा कमी किंवा मुळीच हाेत नाही. सातहून जास्त मित्र करण्याच्या प्रवृत्तीकडे अवसादामधील लक्षणांत वाढीशी जाेडून पाहिले जाते.

एलिझाबेथ यांनी या तथ्याशी स्वत:ला जाेडले. लाॅकडाऊनमध्ये दीर्घकाळ त्या स्वत: एकटेपण अनुभवत हाेत्या. या काळात मी माेठ्या संख्येने मित्र केले. त्यांच्या संपर्कातही राहिले. परंतु सर्वांशी संपर्कात राहणे शक्य झाले नाही. अनेकांना तर मी आेळखतही नाही. त्यामुळे काही लाेकांची वाईट मैत्रिण ठरले. काही व्यक्तींसाठी तुम्ही सगळे काही साेडून देता. पहाटे चार वाजता त्यांचे काॅल अटेंड करता. संकट काळात हेच आपल्यासाेबत उभे राहतील, असा विश्वास तुम्हाला वाटत असताे. पण असे मित्र मूठभर असतात. सर्वांशी निकटचे संबंध गरजेचे नाहीत. अनेकवेळा गर्भपाताच्या वेदना सहन केलेल्या एलिझाबेथ म्हणाल्या, अशा दु:खद क्षणी वास्तवात तुमचे मित्र काेण? याचा धडा तुम्हाला मिळताे. मला असे मित्र मिळाले हे मी माझे नशीब समजते. सर्वात चांगली मैत्रीण एम्माबद्दल सांगितले. एम्मा नेहमी त्यांच्यासाेबत असतात. त्याबदल्यात त्यांना एलिझाबेथकडून काहीही नकाे असते. एलिझाबेथ भारत तसेच आशियाई देशांतील अभ्यासांचे उदाहरण देतात. या देशांत लाेक दाेस्तीमध्ये समानता व संस्कृतीला महत्त्व देतात. त्यामुळे मैत्री दीर्घकाळ टिकून राहते.

कक्षा माेठी म्हणून मित्रही जास्त हे आवश्यक नाही : दावा खूप जास्त मित्र असणे ही बाब सामाजिक संपर्कातील माेठा अडथळा असते, याची खूप लाेकांना जाणीव नसते. कारण मैत्रीची जबाबदारी निभावण्यात कमी पडताे असे ते स्वत:ला समजू लागतात. जर्नल पर्सनॅलिटी अँड साेशल सायकाॅलाॅजीच्या अभ्यासानुसार कमी मित्र असलेल्यांशी संपर्काचा लोक प्रयत्न करतात. त्यामुळे सामाजिक कक्षा माेठी अाहे म्हणून जास्त लाेक मैत्री करतील हे गृहीतक चुकीचे ठरते.