आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Took 7002 Bitcoins And Forgot The Password; 8 Attempted, 2 More Times If The Password Is Missed, 1700 Crores Will Loss

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाय रे नशीब:7002 बिटकॉइन घेऊन पासवर्ड विसरला; 8 अटेम्प्ट झाले, आणखी 2 वेळा पासवर्ड चुकला तर 1700 कोटींना चुना

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिटकॉइनची अनोखी सुरक्षा व्यवस्थाच झाली अडचणीची, कारण-पासवर्ड होत नाही रिजनरेट
  • लोकांनी असेच गमावले आहेत 10 लाख कोटी रुपयांचे बिटकॉइन

सॅनफ्रान्सिस्काेचे प्रोग्रॅमर स्टीफन थाॅमस यांची झोप उडाली आहे. याचे कारण आहे विसरलेला पासवर्ड. पासवर्ड आठवला तर ते अब्जाधीश होतील. कारण त्यांना १७०० कोटी रुपये असलेले डिजिटल वॉलेट उघडता येईल.

स्टीफन यांनी काही वर्षांपूर्वी ७००२ बिटकॉइन्स (आभासी चलन) विकत घेतले होते. ते त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये आहे. आता त्याचे मूल्य १७०० कोटींवर गेले आहे. मात्र, ते आता स्टीफन यांना आपला पासवर्डच आठवेनासा झाला आहे. पासवर्ड टाकला तरच त्यांना ‘अायर्न की’ नावाचे एक लहान हार्डड्राइव्ह उघडता येईल. त्यात बिटकॉइन असलेल्या वॉलेटची प्रायव्हेट-की आहे. काही वर्षांपूर्वी स्टीफन यांनी बिटकॉइन खरेदी करून कागदावर आयर्न कीचा पासवर्ड लिहिला. मात्र बिटकॉइनचे मूल्य कोसळल्याने स्टीफन यांनी त्याकडे ढंुकूनही पाहिले नाही. तो कागदही हरवला आहे. आता मूल्य वाढताच त्यांना पैसा दिसू लागला, पण तो हाती येत नाही आहे. स्टीफन यांना काही केल्या पासवर्ड आठवत नाही आहे. गोची अशी आहे की, १० वेळाच पासवर्डचा अटेम्प्ट करता येतो. तो चुकला की वॉलेट कायमचे सील व एनक्रिप्ट होईल. त्यांनी पासवर्ड टाकण्याचे आठ अटेम्प्ट केले आहेत. आता दोनच अटेम्प्ट उरले आहेत. म्हणजे २ चुका केल्या की ते कायमचे १७०० कोटी रुपये गमावतील.

साधारणपणे बँकच ग्राहकांचे खाते अनलॉक करून देत असते. मात्र बिटकॉइनवर कुणाचेही नियंत्रण नाही. यामळे पासवर्ड री-जनरेट करण्याची सुविधा नाही. या चलनाचा निर्माताही सातोषी नाकामोटो अशा खोट्या नावाची व्यक्ती आहे. कुणीही कुठूनही डिजिटल अकाउंट उघडून बिटकॉइन ठेवू शकेल, त्यावर सरकार वा नियामकाचे नियंत्रण नसावे, अशी त्यामागील संकल्पना होती. ही अनोखी सुरक्षा व्यवस्थाच अडचणीचे कारण ठरत आहे.

लोकांनी असेच गमावले आहेत १० लाख कोटी रुपयांचे बिटकॉइन

वॉलेट रिकव्हरी सर्व्हिसेस चेनालिसिसनुसार जगात १.८५ कोटी बिटकॉइन आहेत. यातील २०% (१० लाख कोटी रु.) त्यांच्या मालकांनी गमावले आहेत. ही फर्म हरवलेली ‘डिजिटल की’ मिळवण्यासाठी मदत करते. पासवर्ड रिकव्हरीसाठी त्यांना रोज ७० फोन येत आहेत. ते गेल्या महिन्याच्या तीनपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...