आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळची तयारी:पाेर्तुगालमध्‍ये पर्यटकांच्या जहाजांमुळे आफ्रिकन बेटावर झगमगाट...

मदेराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाताळच्या प्रकाशात न्हाऊन जाणारे हे छायाचित्र पाेर्तुगालच्या स्वातशासी मेदरा शहरातील बंदराचे आहे. या बेटावर नाताळच्या आधी अजुरा व एेडानाेवा नावाची जहाजे डेरेदाखल झाली आहेत. यातून नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटक येथे मुक्कामी आले आहेत. मदेरा पाेर्तुगालमध्ये आफ्रिकेच्या उत्तर-पश्चिमेकडील किनाऱ्यावरील बेटांपैकी आहे. येथे तीन वर्षांनंतर नाताळची धामधूम पाहायला मिळत आहे. त्याचे स्वरूप भव्य आहे. आतापर्यंत येथे २५ हजार पर्यटक दाखल झाले आहेत. युराेप ते अमेरिकेपर्यंत जगभर नाताळची तयारी पूर्ण झाली आहे. विनाव्यत्यय हा सण साजरा करण्यासाठी सिंगापूरने डिजिटल मॅप तयार केला आहे. हा नकाशा उत्सव काळातील गर्दी नियंत्रण व्हावे यासाठी सुरक्षा दलास आणि नागरिकांसाठीही उपयाेगी ठरेल.

बातम्या आणखी आहेत...