आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तंबूलचा वारसा पाहू शकतील पर्यटक:12 वर्षांच्या दुरुस्तीनंतर 900 वर्षे जुना महाल खुला

इस्तंबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरातील आयडोस कॅसलचे(महाल) आहे. १२ वर्षांच्या नूतनीकरणानंतर हा सर्वसामान्यांसाठी खुला केला जात आहे. शुक्रवारी तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसप तैयप एर्दाेगन यांनी सिटी स्क्वेअरमधील समारंभात याचे उद्घाटन केले. या महालास केसी कॅसल नावानेही ओळखले जाते. रोमन साम्राज्यादरम्यान ११ व्या शतकात याचे बांधकाम झाले होते. येथे आगंतुकांना चालण्यास व सायकल चालवण्यासह ताज्या हवेतील क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची संधी मिळेल. द नेचर बुक्स लायब्ररी आणि टेरेस या महालाचा हिस्सा आहे. हा सुमारे १,३६,७०१ चौ.फुटांत विस्तारला आहे. १९८२ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ ब्रायन मॅथ्यू यांनी याचा शोध लावला होता. यानंतर प्रथम श्रेणीतील पुरातत्त्व वारशात समाविष्ट केले. २०१० मध्ये पुनर्निमितीचे काम सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...