आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना इफेक्ट:युरोपात पर्यटक वाढले; ब्रिटनमध्ये 82 % घट, सलग दुसऱ्या वर्षीही नुकसान

लंडन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटन : अमेरिकेनंतर जगात संसर्गात दुसऱ्या क्रमांकावरील देश

कोरोना काळानंतर युरोप पर्यटकांसाठी खुला होत आहे. विविध देशांत पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु ब्रिटनकडे मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुरवठा करणारी यंत्रणा कोलडली आहे. त्याशिवाय पर्यटनासंबंधीच्या नियमावलीत सतत होणारा बदल इत्यादी कारणांमुळे पर्यटक ब्रिटनला जाणे टाळू लागले आहेत. २०१९ च्या तुलनेत ब्रिटनमधील पर्यटकांचा आेघ ८२ टक्क्यांनी घटला आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय पर्यटन मंडळाच्या म्हणण्यानुसार नाताळ व नूतन वर्षादरम्यान देखील पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाही. ब्रिटनचा शेजारी देश फ्रान्समध्ये २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पर्यटकांचे प्रमाण ३५ टक्के राहिले. फ्रान्सच्या तिजोरीत पर्यटनातून ४३०० कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. ब्रिटनमधील पर्यटनविषयक संघटनेचे कर्त जॅन्सन म्हणाले, कोरोनाचे वाढते रुग्ण आणि सरकारचे चुकीचे धोरण यामुळे पर्यटनात घसरण होत आहे.

स्पेन : पर्यटकांचे प्रमाण ६४ टक्क्यांनी वाढले. अर्थव्यवस्थेत २५०० कोटी रुपयांची अतिरिक्त उत्पन्न झाले.

तुर्की : पर्यटकांची संख्या २०१९ च्या तुलनेत ७४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे २१०० कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई झाली.

पोर्तुगाल : पर्यटकांच्या संख्येत ६८ टक्के नफा झाला. २२०० कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत.

पर्यटकांनी का फिरवली पाठ?
- ब्रिटनमध्ये आतापर्यंत ६९ टक्के लोकांनी लस घेतली. पोर्तुगालमध्ये ८७ टक्के लोकांचे लसीकरण झाले.
- ब्रिटनमध्ये अजूनही लोक कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत. पंतप्रधान जॉन्सन गेल्या महिन्यात एका रुग्णालयात विनामास्क दिसून आले होते.

बातम्या आणखी आहेत...