आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Toxic Pollution Particles Found For First Time In Lungs, Brain Of Unborn Baby; They Arrived Because The Mother Breathed

आश्चर्यकारक खुलासा:न जन्मलेल्या बाळाच्या फुप्फुसात, मेंदूत प्रथमच आढळले विषारी प्रदूषणाचे कण; ते आईने श्वास घेतल्यामुळे पोहोचले

स्कॉटलंड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वायू प्रदूषण सर्वांसाठी धोकादायक आहे. यामुळे अकाली प्रसूती, गर्भपात, जन्मावेळी कमी वजन आदी समस्या निर्माण होतात. मात्र, शास्त्रज्ञांना प्रथमच न जन्मलेल्या बाळाच्या (भ्रूण) फुप्फुस व मेंदूत प्रदूषण आणि त्यामध्ये असलेले विषारी कण आढळले आहेत. हे कण बाळाच्या आईद्वारे पोहोचतात. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनातून हेही कळाले की, प्रदूषणाचे कण प्लॅसेंटामध्येही आढलले आहेत.

स्कॉटलंड, बेल्जियममध्ये ७ ते २० आठवड्यांच्या ३६ भ्रूणांवर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञ म्हणाले की, हा शोध चिंताजनक आहे. एका क्यूबिक मिलिलिटर टिश्यूमध्ये हजारो ब्लॅक कार्बनचे कण आढळले आहेत. ते गर्भावस्थेमध्ये आईने श्वास घेतल्यामुळे रक्त प्रवाह आणि प्लॅसेंटाद्वारे भ्रूणामध्ये पोहोचले आहेत. हे कण वाहने, घरे आणि कारखान्यांमधून निघालेल्या धुराच्या काजळीद्वारे तयार होतात. शरीरामध्ये सूज तयार होते. संशोधनात समाविष्ट एबरडीन विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल फाउलर यांचे म्हणणे आहे की, ‘ब्लॅक कार्बन नॅनोपार्टिकल्स आईच्या गर्भातून पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत प्लॅसेंटात जातात आणि विकसित भ्रुणांच्या अवयवांमध्येही आपला मार्ग शोधतात. ते विकसित होणाऱ्या मेंदूतही जातात.’ संशोध उपप्रमुख प्रा. टिम नवरोट सांगतात, मानवी विकासाच्या सर्वात संवेदनशील टप्प्याचा विचार करणे गरजेचे आहे.

आयुष्यभर राहू शकतो विषारी प्रदूषणाच्या कणांचा प्रभाव जगाची ९०% लोकसंख्या वायु प्रदूषणाची मानके पार केली अशा ठिकाणी राहते. ताजे संशोधन प्रभावी पद्धतीने सांगत आहे की, विषारी कण भ्रूणाच्या मेंदूला प्रभावित करतात. कदाचित हे कण बाळासाठी आयुष्यभर परिणामकारक ठरू शकतात.

बातम्या आणखी आहेत...