आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Tracking Uighur Muslims And Tibetans, China Conducts DNA Testing Of 700 Million People To Create Largest Genetic Map

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:उइगर मुस्लिम आणि तिबेटींची ट्रॅकिंग, सर्वात मोठा जेनेटिक मॅप बनवण्यासाठी चीन करतोय 70 कोटी लोकांची डीएनए चाचणी

सुई ली वी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीएनए चाचणीसाठी किट उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीला खासदारांचा विरोध

चीनमध्ये पोलिसांच्या मदतीने ७० कोटी पुरुष आणि मुलांच्या रक्ताचे नमुने गोळा केले जात आहेत. जगातील सर्वात मोठा जेनेटिक मॅप बनवणे हा त्याचा हेतू आहे. हे चीन सरकारचे लोकांवर गुप्त लक्ष ठेवण्याचे शक्तिशाली शस्त्र मानले जात आहे. या ताकदीचा वापर देशात राहणारे उइगर मुस्लिम, तिबेटी वंशाचे अल्पसंख्याक आणि काही विशेष समूहांना ट्रॅक करण्यासाठी केला जात आहे. चीनमध्ये २०१७ पासून सुरू असलेल्या मोहिमेत पोलिस पुरुषांचे रक्त, लाळ आणि इतर जेनेटिक मटेरियलचे नमुने गोळा करत आहेत. या कामात अमेरिकेची कंपनी थर्माे फिशर मदत करत आहे. ही कंपनी चीनला हवी तशी चाचणी किट बनवून विकत आहे. अमेरिकेच्या खासदारांनी कंपनीचा कडाडून विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे चीनचे त्यांच्याच लोकांवरील जेनेटिक नियंत्रण वाढले आहे. देशभरात कॅमेरे, फेशियल रिकग्निशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे चिनी पोलिसांनी असे नेटवर्क तयार केले आहे, त्यातून लोकांना सहज ट्रेस केले जाऊ शकते. मात्र, या डेटाबेसचा वापर गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेला जात असल्याचे चिनी पोलिसांचे म्हणणे आहे, तर यामुळे लोकांची गोपनीयता धोक्यात येईल, अशी भीती चीनचे काही अधिकारी आणि चीनबाहेरील मानवाधिकार संघटना व्यक्त करत आहेत. सरकारविरोधात आवाज उठवणारे आणि त्यांच्या कुटुंबांचे दमन होईल.

चीनमध्ये लोकांचा विरोध असतानाही मोहीम वेगाने राबवली जात आहे. पोलिस पथके शाळांमधूनच मुलांचे नमुने घेत आहेत. उत्तर चीनचे संगणक अभियंते जियांग हाओलिन यांनी सांगितले, मला रक्ताचे नमुने द्यावे लागले, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नमुना न दिल्यास माझे घर काळ्या यादीत टाकण्याची पोलिसांनी धमकी दिली.

डीएनए तपासणीच्या नावाने घेतलेल्या नमुन्यांवरून लोक फसवले जातील

मानवाधिकार कार्यकर्ते ली वेई यांचे म्हणणे आहे की, डीएनए नमुन्याचा दुरुपयोग सहज केला जाऊ शकतो. हे नमुने गुन्हा घडला तेथे ठेवून फसवले जाऊ शकते, मग तुम्ही तेथे उपस्थित नसले तरी. जेनेटिक सायन्स चीनच्या पोलिस अधिकाऱ्यांना त्या लोकांविरोधात खटला चालवण्याची अनियंत्रित शक्ती देतो, जे त्यांना आवडत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...