आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅटिकन:पोप यांनी तोडली परंपरा; दोन महिलांची नियुक्ती, नियम बदलून महिलांसाठी मार्ग खुला

व्हॅटिकन सिटी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिश्चन समुदायाचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक परंपरेला तोडताना महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. त्यांनी व्हॅटिकनमध्ये केवळ पुरूष काम करत असलेल्या पदांची जबाबदारी दोन महिलांवर सोपवली आहे.

पोप यांनी इटालियन मॅजिस्ट्रेट कॅटिया सुमारिया यांना व्हॅटिकनच्या कोर्ट ऑफ अपीलमध्ये वूमन प्रमोटर ऑफ जस्टीस म्हणून नियुक्त केले आहे. या मोठ्या पदावर कॅटिया आल्यामुळे आता त्या सर्व बैठकीत सहभागी होऊ शकतील. त्यांच्या नियुक्तीबाबत पोप म्हणाले, ही गोष्ट खूप आधीच व्हायला पाहिजे होती. कॅटिया व्हॅटिकनच्या दृष्टीने युवा आहेत. पोप यांनी व्हॅटिकनच्या अनेक नियमांत बदल करून महिलांसाठी मार्ग मोकळा केला आहे. त्यांच्यावर अनेक नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना आता चर्चचे आल्टरवर मिनिस्टर सेवा देण्याची परवानगी असेल. परंतु अजूनही पादरींच्या जबाबदारीपासून महिला वर्ग दूर आहे. २०१८ मध्ये १० हजार लोकांनी याचिका दाखल केली होती. त्यात महिलांना हक्क देण्याच्या बाजूने हजारो लोकांनी मत मांडले होते.

बातम्या आणखी आहेत...