आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Transformation Of Afghanistan Into An Infiltration Camp; Schools hospitals Dew, Doctors health Workers Underground Due To Terror

ग्राउंड रिपोर्ट:अफगाणिस्तानचे रूपांतर घुसखोरांच्या छावणीत; शाळा-रुग्णालये ओस, दहशतीमुळे डॉक्टर-आरोग्य कर्मचारी भूमिगत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लश्करगाहच्या आई-मुलीला कंदहारच्या छावणीत राहण्याची वेळ आली आहे. - Divya Marathi
लश्करगाहच्या आई-मुलीला कंदहारच्या छावणीत राहण्याची वेळ आली आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेवरील क्षेत्रातही काबूल विमानतळासारखी स्थिती दिसून येते. हजारो भेदरलेले लोक दहशत आणि अराजकतेमुळे तुर्कमेनिस्तान, उझ्बेकिस्तान, इराण, ताजिकिस्तान आणि पाकिस्तानसह दुसऱ्या देशांत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकी अनेक लोकांना उपचारासारख्या मूलभूत गोष्टींसाठी या देशांत जाणे गरजेचे वाटते. अफगाणिस्तानवरील तालिबानच्या वर्चस्वानंतर उत्तर अफगाणिस्तानातील बहुतांश आरोग्य सेवा केंद्रे बंद झाली आहेत. डॉक्टर व परिचारिका-आरोग्य कर्मचारी भूमिगत झाले आहेत किंवा त्यांनी देश सोडला आहे. हेराटमधील नजीब उल्ला यांना त्यांच्या ७५ वर्षीय हृदयरुग्ण वडिलांचा उपचाराअभावी मृत्यू होईल, अशी भीती सतावते. ते म्हणाले, आता देशातील रुग्णालये उद्ध्वस्त झाली आहेत. आेस पडलेल्या रुग्णालयांत ना डॉक्टर, ना नर्स असे चित्र आहे. पत्नीच्या उपचारासाठी भटकणारा एक व्यक्ती म्हणाला, तालिबानच्या वर्चस्वानंतर डॉक्टर, नर्स पळून गेले आहेत. प्रत्येकाप्रमाणेच तेदेखील तालिबानला घाबरले आहेत. त्यांनी भीतीपोटी रुग्णालये तशीच साेडून दिली आहेत. प्रत्येकाला तालिबानचा इतिहास ठाऊक आहे.

तालिबानने ९० च्या दशकात सत्तेवर असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना यातना दिल्या होत्या. त्याची दहशत अजूनही लोकांच्या मनात आहे. तालिबानपासून सुरक्षित राहण्यासाठी सहा सदस्यांच्या एका कुटुंबाने काबूल साेडले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर हे कुटुंब दैनिक भास्करला म्हणाले, माझी थोरली मुलगी काबूलमध्ये एका एनजीआेसाठी काम करत होती. मी एका अमेरिकी एनजीआेसाठी काम केले आहे. काबूल एवढ्या लवकर पराभूत होईल, असे वाटले नव्हते. या गोष्टीसाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या तयार नव्हते. आम्हाला पासपोर्टच्या नूतनीकरणाची संधीच मिळाली नाही. त्याचे डोळे डबडबलेले होते. तो म्हणाला, अफगाणिस्तानात कोणीही सुरक्षित नाही. तालिबानने लोकांचा शोध सुरू केला आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी काम करणाऱ्यांचा ते शोध घेत आहेत. केंद्रीय व्यवस्था संपुष्टात आल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत. कोणीही त्याचे दर नियंत्रणात आणत नाही. दहशत म्हणून बहुतांश दुकाने बंद आहेत. लोक दुप्पट पैसा मोजून रेशन जमवू लागले आहेत. लोकांना भविष्य अंधारात वाटू लागले आहे.

बहुतांश शाळा बंद, मुलींची संख्या नगण्य
हेलमंड प्रांतात अलीकडे संघर्ष वाढल्याने मृत्यू संख्येतही वाढ झाली आहे. येथे बंडखोर गट तालिबानशी संघर्ष करत आहेत. येथील हजारो पलायन करू लागले आहेत. या प्रांतील हेलमंड, लश्करगाह, गेरेश्क, नादअली जिल्ह्यातील शाळांत मुली दिसून येत नाहीत. शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्या आेस दिसून येतात. मुलींमध्ये तालिबानची जास्त भीती आहे.

बातम्या आणखी आहेत...