आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:फेसबुकवर विश्वासघाताचा खटला; हरल्यास इन्स्टाग्राम-व्हॉट्सअॅप विकावे लागू शकते, त्यामुळे झुकेरबर्ग यांचे साम्राज्य ढासळू शकते

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी ग्राहक संरक्षण नियामक आणि 48 राज्यांनी फेसबुकवर केला एकाधिकारशाहीचा आरोप

कर्ट वॅगनर आणि साराह फ्रियर
अमेरिकेत ग्राहक संरक्षण नियामकांनी (एफटीसी) मार्क झुकेरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील फेसबुक या कंपनीवर विश्वासघात कायद्यांतर्गत खटला दाखल केला आहे. फेसबुकवर बाजारातील स्पर्धा संपवण्यासाठी शक्तीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. एफटीसी आणि ४८ राज्यांच्या अॅटर्नी जनरलनी बुधवारी खटल्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर फेसबुकचे शेअर ४% पर्यंत घसरले. प्रतिस्पर्ध्यांना खरेदी करून सोशल नेटवर्किंगच्या विश्वात एकाधिकारशाही निर्माण करण्याची फेसबुकची इच्छा असल्याचा आरोप आहे. २०१२ मध्ये इन्स्टाग्रामची ५,३६२ कोटी रुपयांत आणि २०१४ मध्ये १.६५ लाख कोटी रुपयांत व्हॉट्सअॅपची खरेदी यावरून कंपनी वर्चस्व स्थापित करू इच्छिते हे दर्शवते. याचिकेत म्हटले आहे की, यापूर्वीही या करारांचे प्रकरण नियामकांसमोर आले होते, तेव्हा हे करार प्रस्तावित होते. पण नंतर समजले की हे करार बाजारातील निरोगी स्पर्धेसाठी घातक आहेत. फेसबुकने व्यवसायाचे दोन भागांत विभाजन करावे, अशी एफटीसीची इच्छा आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी उभारलेल्या सोशल मीडियाच्या साम्राज्याच्या अस्तित्वासाठी हा विचार धोकादायक आहे. त्याचे कारण म्हणजे कंपनीचे उत्पन्न इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपद्वारे वाढत आहे आणि त्या बळावर फेसबुक डिजिटल कॉमर्समध्ये उतरत आहे. हे दोन्ही नफा देणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हातातून गेल्यास फेसबुकची लाँग टर्म व्हॅल्यू संपेल. वेडबश सिक्युरिटीजचे विश्लेषक डेन इव्हज यांच्या मते, फेसबुकचे विभाजन ही गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी असेल, कारण विलीनीकरणानंतर आताच लाभांश मिळण्यास सुरुवात झाली होती. या वर्षी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपद्वारे ई-कॉमर्समधील दिग्गज होण्याची फेसबुकची इच्छा आहे, ती शक्यता कमी दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, फेसबुकची महसुली वाढ आता थांबेल. अर्थात प्रकरण सध्या कोर्टात विचाराधीन आहे.

फ्रान्समध्ये डेटा प्रायव्हसीचे उल्लंघन, गुगलला ८९० कोटी रु. चा दंड
फ्रान्सने गुगलला ८९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलवरील हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. फ्रान्सच्या ऑनलाइन अॅडव्हर्टायझिंग ट्रॅकर्सच्या (कुकीज) नियमांच्या उल्लंघन प्रकरणात हा दंड ठोठावला आहे. अॅमेझॉनलाही ३११ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलची फ्रेंच वेबसाइट आणि अॅमेझॉनने अॅडव्हर्टायझिंग कुकीज संगणकात सेव्ह करण्यासाठी लोकांची परवानगी घेतली नव्हती, असे फ्रान्सच्या नियामकांना आढळले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser