आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:जीन थेरपीने कर्करोग, रक्तविकारांसह अनेक गंभीर आजारांवर उपचार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूलभूत संशोधनाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे जीवशास्त्रात अनेक शक्यता निर्माण होत आहेत. अलीकडील दोन वैज्ञानिक शोधांनी हे सिद्ध केले की, आनुवंशिक संशोधनामुळे आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात. १८ ऑगस्टला सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जेनेटिक बदलाद्वारे वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बदलणे शक्य आहे. दुसऱ्या हरितक्रांतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यासोबतच जीवघेण्या असाध्य आजारांनी त्रस्त रुग्णांच्या जनुकांत बदल करून चांगले परिणाम दिसले. ब्लड कॅन्सर, स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी, हिमोफिलिया, सिकलसेलसारख्या आजारांवर जीन थेरपी आल्या आहेत किंवा येत आहेत.

जेनेटिक थेरपीने भयंकर रोगांवर उपचार करण्याची आशा जागवली आहे. परंतु, महागड्या उपचारांमुळे अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, सुरुवातीला खूप महाग असलेली अनोखी औषधे नंतर परवडणारी ठरली. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मते, मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार पूर्वी अत्यंत महाग होते. दहा वर्षांनंतर त्याचे मूल्य पन्नास पट कमी झाले.

२०१० मध्ये दुर्मिळ रोगांवर उपचार करण्यासाठी नियामकांनी फक्त एक नवीन जीन थेरपी मंजूर केली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया या दोन रक्तविकारांच्या उपचारांना मान्यता देण्यात आली आहे. रिजनरेटिव्ह मेडिसिन अलायन्स या पेशी आणि जीन थेरपी उद्योगातील एक गट म्हणतो की, १३६९ गट अशा उपचारांवर काम करत आहेत. दोन हजारांहून अधिक क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. अशा सेल थेरपी आहेत, ज्यात रुग्णाचे जीन्स बदलण्याची गरज नसते. केंब्रिजमधील सेंटर फॉर बायोमेडिकल इनोव्हेशनच्या शास्त्रज्ञांच्या मते, २०३० पर्यंत ४०-५० जनुक उपचारांना क्लिनिकल वापरासाठी मान्यता मिळू शकते. जीन थेरपीमध्ये अनेक आव्हाने आहेत. ऑगस्टमध्ये नोव्हार्टिस या स्विस औषध कंपनीने अहवाल दिला की, स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी या स्नायूंच्या रोगावर जीन थेरपी उपचारांमुळे दोन मुलांचा मृत्यू झाला. चाचणीत मृत्यूची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. संशोधन आणि चाचण्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे बहुतांश जनुक थेरपी खूप महाग असतात. रोश या फार्मा कंपनीने दृष्टी कमी होण्याच्या उपचारासाठी लक्सटर्ना जीन थेरपीचा एका डोळ्यासाठी ३.४० कोटी रुपये दर ठेवला आहे. नोव्हार्टिसने स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी थेरपीची किंमत १६ कोटी रुपये निश्चित केली आहे.

सोयाबीनचे उत्पादन २०% पर्यंत वाढेल
सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, इलिनॉय विद्यापीठाचे डॉ. स्टीफन लाँग आणि त्यांच्या टीमने सोयाबीन वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बदल करून उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. बहुतांश झाडांपासून २०% आणि एका झाडापासून ३३% उत्पादन वाढले. शास्त्रज्ञांनी तंबाखूची तीन जनुके सोयाबीनच्या वनस्पतींसोबत एकत्र करून प्रकाश संश्लेषण वाढवले. अशा वनस्पतींचे उत्पादन जास्त होते. गहू व तांदळावरही हे प्रयोग केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...