आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Treatment Of Mental Patients With Indian Cows In Australia, Behavioral Improvement Due To Cow Association

काऊ थेरपी:ऑस्ट्रेलियातील मानसिक रुग्णांवर भारतीय गायींसह उपचार, गायींच्या सहवासात राहिल्याने वर्तणुकीत सुधारणा

ब्रिस्बेन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय गायींच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात मानसिक आजारी व्यक्तींवर उपचार केले जातात. नॉर्थ क्वीन्सलँडमध्येे गायींचे सान्निध्य केंद्र सुरू करण्यात आले आहे, जेथे लोक मनःशांतीसाठी पोहोचत आहेत. गायींसोबत वेळ घालवून शांतता मिळवणे, त्यांना आलिंगन देणे, त्यांची सेवा करणे त्यासाठी शुल्क आकारले जात आहे. या वर्षापासून चार एनडीआयएस कंपन्या (राष्ट्रीय अपंगत्व विमा योजना) त्यांच्या नवीन योजनेतदेखील ही उपचार पद्धती समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. भारतीय प्रजातीच्या गायी शांत असल्याने त्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. मानसिक त्रासातून जात असलेली डोना अस्टिल ‘काऊ कडलिंग को’ फार्ममध्ये गायींची सेवा करते.

मानसिक आजारी असूनही तिला येथे नोकरी मिळाली. ती मनाेविकार, चिंता आणि नैराश्याने ग्रस्त हाेती. पण हळूहळू बरी होत आहे. ती म्हणते, या भारतीय गायींनी माझे प्राण वाचवले आहेत. एक वर्षापूर्वीपर्यंत जर मला कुणी काऊ थेरपीबद्दल सांगितले असते तर मला ते हास्यास्पद वाटले असते, परंतु एका वर्षात मी नेहमीपेक्षा चांगल्या मानसिक स्थितीत आहे. माझ्या जुळ्या मुलांनाही हे जाणवत आहे. प्रत्येक गायीचे स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. येथे गायी स्वमग्न (ऑटिझम स्पेक्ट्रम) रुग्णांसाठी थेरपिस्ट बनल्या आहेत. त्यांच्यावर गायींच्या सान्निध्यात उपचार केले जात आहेत. पूर्वी त्यांना घोड्याच्या तबेल्यात पाठवत. त्याला इक्विन थेरपी म्हणतात. ऑटिझम कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ टेंपल ग्रँडिन म्हणतात की या आजाराने ग्रस्त व्यक्ती इतर व्यक्तींबराेबर जुळवून घेऊ शकत नाहीत. पण त्यांना प्राण्यांसाेबत आरामदायी वाटते. हळूहळू ते समाजात मिसळू लागतात. हाॅर्स थेरपीला पर्याय म्हणून आता ऑस्ट्रेलियामध्ये काऊ थेरपी लोकप्रिय होत आहे.

लॉरेन्सला अभ्यास करताना सुचली कल्पना, क्रिप्टोकरन्सीने खरेदी केल्या गायी लॉरेन्स फॉक्सने या सर्व गायी क्रिप्टोकरन्सीद्वारे खरेदी केल्या आहेत. सेंट्रल क्वीन्सलँड विद्यापीठातून एमबीए करत असताना गाय उपचार व्यवसायाची कल्पना त्यांना सुचली. त्याची फी आणि त्यातून मिळणारे उत्पन्न त्यांनी सांगितले नाही.

बातम्या आणखी आहेत...