आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनच्या नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतवंशीय ऋषी सुनक व लिज ट्रुस यांच्यातील सामना रंगू लागला आहे. फायनलमध्ये सुनक यांना काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या १३७ खासदारांचा पाठिंबा होता. तेव्हा ट्रुस यांना केवळ ११३ खासदारांचा पाठिंबा मिळवता आला होता. आता पक्षाचे दोन लाख स्थायी सदस्य मतदान करतील. त्याच्या आधारे नवीन पंतप्रधानांची निवड होईल. परंतु त्यात सुनक पिछाडीवर दिसून येतात. युगॉव पाहणीत ट्रुस यांना सुनक यांच्याहून २८ टक्के आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले. ब्रिटनच्या वेगवेगळ्या भागात दोन्ही उमेदवार जाहीर सभा घेतील. परंतु सुनक व ट्रुस यांच्यातील अंतर पुढेही कायम राहिल, असे सांगितले जाते. अन्य एका पाहणीनुसार पक्षातील प्रत्येकी दहापैकी सहा सदस्यांचा ट्रुस यांना पाठिंबा आहे.
महागाईवर नियंत्रण, दीर्घकालीन कर कपातीचे सुनक समर्थक कर अर्थव्यवस्थेबाबत सुनक यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. करकपातीपेक्षाही महागाई कशी नियंत्रणात ठेवता येईल, यावर माझा भर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दीर्घकालीन करकपातीचे ते समर्थक आहेत. तीन हजार पौंडपर्यंतच्या वीज बिलांवरील व्हॅॅटमध्ये कपात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पुढील वर्षी उद्योग करात वाढ करण्याची त्यांची भूमिका आहे. ट्रुस यांनी २.८५ लाख कोटी रुपयांच्या कर कपातीचा प्रस्ताव आणण्याचे ठरवले आहे. नागरिकांकडील पैसा कायम ठेवण्याचा त्यांचा उद्देश आहे. सुनक यांनी आणलेल्या राष्ट्रीय विमा वृद्धीमध्ये बदल करण्याची त्यांची इच्छा आहे. एनर्जी बिलातील ग्रीन लेवी कमी केली जाईल. उद्योग करातील प्रस्तावित वाढीला १९ टक्क्यांहून २५ टक्के करण्याची योजना गुंडाळणार आहेत.
९६ टक्क्यातील २१ टक्के रूढीवादी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टचे, सुनक यांच्यासाठी अडथळा काँझर्व्हेटिव्ह पार्टीतील ९६ टक्के श्वेत सदस्यांपैकी २१ टक्के रूढीवादी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टचे सदस्य आहेत. सुनक यांना या सदस्यांचा पाठिंबा मिळणे कठीण आहे. खासदारांच्या समर्थनानंतर सुनक पिछाडीवर पडण्यामागे श्वेत सदस्य कारणीभूत आहेत. पक्षाचे ६८ टक्के सदस्य वयाच्या पन्नाशीतील आहेत. त्यात बहुतांश श्वेत सदस्याला पाठिंबा देणे पसंत करतात.
सुनक चीनच्या तंत्रज्ञानावर तोडगा आणणार, चीनवर अवलंबित्व संपवण्याचे समर्थक- ट्रूस ब्रिटनसाठी चीन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठा धोका व आव्हान आहे, असे सुनक यांना वाटते. देशातील सर्व ३० कन्फ्युशियस केंद्र बंद करण्याचे त्यांचे मत आहे. त्यासोबत चीन-ब्रिटन संशोधन प्रकल्पांचा आढावा घेण्यावर भर आहे. चीनच्या तंत्रज्ञानातील आक्रमणाला रोखण्यासाठी ‘नाटो-शैलीत’ आघाडी स्थापन करण्याचा सुनक यांचा विचार आहे. चीनची आैद्योगिक हेरगिरीही बंद करू. चीनवरील अवलंबित्व थांबवावे असा विचार ट्रुस यांनी मांडला आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या उभारणीत चीनवर अवलंबून राहू नये. व्यापार व गुंतवणुकीच्या माध्यमातून चीनचा मुकाबला केला जाईल. ब्रिटनने टिकटॉकसारख्या साधनांवर बंदी घातली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.