आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकातील कोलाराडोमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक मिनी ट्रक पलटला आणि कारला धडकल्याचे दिसून येत आहे. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
कारमध्ये बसलेल्या लेजली ब्रॉकने म्हटले की, खड्डा आल्याने गाडीला जोरात झटका बसला. यात ट्रक पलटला आणि आमच्या गाडीला धडकला. काय होत आहे, हे आम्हाला कळालेही नाही. आमच्या हातात काहीच कंट्रोल नव्हता. मला वाटले हे माझे शेवटचे क्षण आहेत.
गाडी चालक थॉमस कुमेल म्हणाला की, आम्ही नॉर्मल स्पीडवर गाडी चालवत होतो. पुढे कोणताही धोका दिसत नव्हता. पण, अचानक जर्क लागला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेलिंगला गाडी धडकली आणि त्यानंतर पुन्हा ट्रकशी टक्कर झाली. अचानक झालेल्या अपघातामुळे आम्ही घाबरलो होते.
अपघाताचे काही फोटोज...
पोलिस म्हणाले - बेजबाबदारपणे गाडी चालवत होते कपल
संबंधित अपघात किती वाजता झाला, याची माहिती मिळाली नाही. तर पोलिसांनी सांगितले की, हे कपल बेजबाबदारपणे गाडी चालवत होते. तर कपलने म्हटले की, खड्ड्यामुळे अपघात झाला. अपघाताच्या दोन दिवसानंतर खड्डा भरण्यात आला आहे. दरम्यान चूक कोणाची होती हे आतापर्यंत स्पष्ट झाले नाही. त्यामुळे दोष कुणाचा हे ठरवण्यासाठी हे प्रकरण कोर्टात नेले जाऊ शकते.
10 मिनिटांत 50 वाहने एकमेकांवर आदळली
चीनच्या हुनान प्रांतात शेकडो गाड्या एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला आहे यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून66 जण जखमी झाले आहेत. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताच्या वेळी महामार्गावर 10 मिनिटांत 50 वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक वाहनांनी पेट घेतला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर या अपघाताचो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटो आणि व्हिडीओवरून हा अपघात किती भीषण आणि विचित्र प्रकारे घडला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.