आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Trump Administration Plans To Block Chinese Airlines, After China Prevented US Airlines From Resuming Service Between The Countries

अमेरिका-चीन वाद:चीनमध्ये आता अमेरिकेतील ठराविक विमानांना लँडींगची परवानगी, बुधवारी ट्रम्प यांनी चीनच्या सर्व विमानांवर बंदी घातली

बीजिंग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेच्या परिवहन विभागाने म्हटले- चीन उड्डाणांबाबत दोन्ही देशात झालेल्या कराराचे उल्लंघन करत आहे

चीन आणि अमेरिकेतील तनाव वाढत आहे. अमेरिकेने बुधवारी(दि.3) 16 जूनपासून चीनच्या सर्व विमानांना देशात येण्यास बंदी झातली आहे. त्यानंतर आता चीनने गुरुवारी(दि.4)म्हटले की, ते आता अमेरिकेच्या ठराविक एअरलाइंसला आपल्या देशात येण्याची परवानगी देणार. 

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली होती. पण, आता परदेशी एअरलाइंसला ठराविक विमानांची परवानगी दिली आहे. यासोबतच अमेरिकी एअरलाइंसवर लावलेली बंदीदेखील हटवली जाईल.

अमेरिकी एअरलाइंसला 1 जूनपासून चीनमध्ये उड्डाण करायचे होते

अमेरिकेच्या ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंटने म्हटले की, जानेवारी 2020 मध्ये दोन्ही देशांमधील उड्डाणे कमी झाली. यानंतर अमेरिकन एअरलाइंस, डेल्टा एअर लाइंस, यूनाइटेड एअरलाइंस अमेरिका आणि चीनदरम्यान फ्लाइट्स ऑपरेट करत होती. चीनच्या एअरलाइंसनेदेखील आपले काही ऑपरेशन बंद केले होते. यूनाइटेड एअरलाइंस आणि डेल्टा एअरलाइंसला 1 जूनपासून चीनसाठी उड्डाणे सुरू करायची होती. परंतू, त्यांच्या विनंतीनंतरही चीन सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. 

चीनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल

ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंटचे म्हणने आहे की, चीन उड्डाणांबाबत दोन्ही देशात झालेल्या कराराचे उल्लंघन करत आहे. दोन्ही देशातील संबंध नीट राहावे, यासाठी चीनसोबत चर्चा केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...