आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जाॅन बाेल्टन यांचे पुस्तक ‘ द रूम व्हेअर इट हॅपंड : अ व्हाइट हाऊस मेमाॅयर’मुळे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यासमाेरील अडचणी वाढू शकतात. या पुस्तकातील काही अंश स्थानिक माध्यमांसमाेर आले आहेत. त्यानुसार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची मदत मागितली हाेती, असा सनसनाटी दावा या पुस्तकातून केला आहे. अमेरिकेसाेबतचे व्यापारी युद्ध संपुष्टात आणावे, अशी भूमिका घेऊन ट्रम्प यांनी चीनमधील उइगर मुस्लिमांच्या यातना छावण्यांसाठी प्राेत्साहन दिल्याचाही दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. ट्रम्प व जिनपिंग यांच्यातील ही खलबते आेसाकामध्ये जून २०१९ मध्ये जी-२० बैठकीदरम्यान झाली हाेती, असे बाेल्टन यांनी म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री माइक पाॅम्पिअाे यांनी ट्रम्प व उत्तर काेरियाचे नेते किम जाँग यांच्यातील पहिल्या भेटीच्या आयाेजनात भूमिका निभावली हाेती. परंतु नंतर ट्रम्प यांचा पाॅम्पिअाे यांच्यावरील विश्वास कमी झाला हाेता. त्यामुळे ट्रम्प यांनी ही जबाबदारी पाॅम्पियाे यांचे सहायक अधिकारी स्टीफन बेगुन यांच्याकडी साेपवली हाेती. वास्तविक पाॅम्पिअाे यांना अमेरिका व उत्तर काेरिया यांच्यात करार हाेईल की नाही, यावर शंका हाेती.
हालचाली: वादात पाॅम्पिअाे हाेनुलूलू येथे बैठकीत सहभागी, मीडियाला टाळले
बाेल्टन यांच्या पुस्तकावरून वादंग सुरू असतानाच परराष्ट्रमंत्री पाॅम्पिअाे यांनी गुरुवारी चीनचे उच्चाधिकारी यांग जियाची यांच्याशी हाेनुलूलूच्या हवाई तळावर चर्चा केली. पाॅम्पिअाे यांच्यासमवेत त्यांचे सहायक अधिकारी बेगुनही उपस्थित हाेते. बैठक बंद खाेलीत झाली. प्रसारमाध्यमांना त्यापासून दूर ठेवले हाेते. बैठकीत जिनपिंग- ट्रम्प चर्चा, अमेरिका-उत्तर काेरिया संबंध, काेराेना संसर्ग, हाँगकाँग स्थितीवर चर्चा झाली.
राजकारण : ट्रम्प : बाेल्टन खाेटे बाेलताहेत, बायडेन म्हणाले : अमेरिकींना विकले
बाेल्टन खाेट बाेलत आहेत. व्हाइट हाऊसमधील सगळे लाेकही बाेल्टन यांचा तिरस्कार करतात. त्यांनी गाेपनीय माहिती जाहीर केली. वास्तविक त्यांच्याकडे असे करण्याची परवानगी नव्हती, असे ट्रम्प यांनी म्हटल.डेमाेक्रॅटिकचे उमेदवार बायडेन म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी अमेरिकी लाेकांना विकून टाकल्याचे बाेल्टन यांच्यामुळे आम्हाला आज समजले. पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी जिनपिंग यांच्याकडे मदत मागितली.
जॉन बोल्टन मुलाखतीदरम्यान
{अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बाेल्टन यांच्या पुस्तकावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र बाेल्टन यांनी उपस्थित केलेल्या गाेष्टी अमेरिकी निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे ठरतील, असे तज्ञांना वाटते.
{ पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी आणण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. हे पुस्तक २३ जून राेजी प्रकाशित हाेण्याची शक्यता आहे. पुस्तकाच्या विराेधात ट्रम्प प्रशासनाने वाॅशिंग्टनच्या रुग्णालयात धाव घेतली हाेती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.