आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प रिटर्न्स:व्हाइट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर 40 दिवसांनी समोर आले ट्रम्प; म्हणाले - मी 2024 मध्ये पुन्हा येणार; भारतावर टीका

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हाइट हाऊस सोडल्यानंतर ४० दिवसांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा समोर आले. तथापि, पराभवाबद्दलचा त्यांचा राग अजूनही कायम आहे. त्यामुळे त्यांनी भाषणात बायडेन यांच्यापासून भारत, चीन आणि रशियावर टीकास्त्र सोडले.

फ्लोरिडाच्या ओरलँडोमध्ये आयोजित कॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या वार्षिक परिषदेत ट्रम्प यांनी हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित केला. पॅरिस करार भेदभावपूर्ण असल्याचे सांगत त्यात पुन्हा सहभागी झाल्याबद्दल बायडेन यांच्यावर टीका केली. भारत अस्वच्छ असल्याची टिप्पणी करत ते म्हणाले, ‘अमेरिका आधीपासूनच स्वच्छ आहे; पण चीन, रशिया, भारत स्वच्छ नाहीत, मग कराराशी पुन्हा जोडले जाण्याचा काय फायदा? आम्ही नियमांचे पालन करत होतो, पण चीन, भारत आणि रशिया तसे करत नव्हते. ते धूर पसरवत होते. चीनने दहा वर्षांत कुठलेही पाऊल उचलले नाही, रशिया जुन्या मापदंडांवर चालतो. आपल्याला सुरुवातीलाच त्याचा फटका बसला आणि आपल्याला हजारो-लाखो नोकऱ्या गमवाव्या लागल्या. चीनविरोधात उभे राहण्यावर आमचा विश्वास आहे. आऊटसोर्सिंग बंद करावे लागेल, आपले कारखाने आणि पुरवठा साखळी पूर्वीच्या स्तरावर आणावी लागेल आणि भविष्यातील जगावर अमेरिका राज्य करेल, चीन नव्हे, हे सुनिश्चित करावे लागेल.’ व्हाइट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प यांनी ‘पुन्हा परतणार’असे म्हणत राजकारणात कायम राहण्याचे संकेत दिले होते. या भाषणात ते म्हणाले,‘मी २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतो. ३ नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकीत पराभव झाल्याचे मी मानत नाही.’ ट्रम्प नवा पक्ष स्थापन करू शकतात, ही अटकळ त्यांनी फेटाळून लावली. त्यांनी एका सर्व्हेचा हवाला देत म्हटले की, ‘मी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी ६८% लोकांची इच्छा आहे. सहभागी ९५% लोकांनी माझ्या धोरणांचे समर्थन केले.’

विचारले, ‘मला मिस केले का?’, म्हणाले-अमेरिका ‘फर्स्ट’ वरून ‘लास्ट’ वर गेला
ट्रम्प यांनी सुरुवातीलाच विचारले, ‘तुम्ही मला मिस केले का?’त्यावर उपस्थितांनी होकार भरला. ट्रम्प म्हणाले, आपण नोकरीविरोधी, कुटुंबविरोधी, ऊर्जाविरोधी, विज्ञानविरोधी असल्याचे बायडेन प्रशासनाने सिद्ध केले आहे. एक महिन्यात आपण ‘अमेरिका फर्स्ट’ वरून ‘अमेरिका लास्ट’ वर आलो आहोत.

बातम्या आणखी आहेत...