आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरचा ट्रम्प यांना दणका:कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरवल्यावर ट्रम्प कँपेनचे अकाउंट ब्लॉक, लहान मुलांचे इम्यून सिस्टम कोविड-19 साठी मजबूत असल्याचा केला होता दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांनी म्हटले होते की, शाळा उघडल्या पाहिजेत, मुलांची इम्यून सिस्टम मजबूत आहे
  • फेसबुकनेही कोविड-19 वरील ट्रम्प यांची पोस्ट केली डिलीट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरचा कठोरपणा कायम आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे कँपेन अकाउंट आता ब्लॉक करण्यात आले आहे. त्यांनी कोरोना व्हायरसविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. या अकाउंटमधून ट्रम्प यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये ते म्हणत होते की, बालकांमध्ये कोविड-19 चा सामना करण्यासाठी जबरदस्त रोगप्रतिकारक शक्ती आहे.

ट्विटरने याला कंपनी पॉलिसीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. खरंतर ट्रम्प यांनीही या व्हिडिओची लिंक ट्विट केली आहे. मात्र ट्विटरने अजून त्यांच्या अकाउंटवर कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही. यापूर्वीही फेसबुकने ट्रम्प यांची कोविड-19 विषयी चुकीची माहिती डिलीट केली होती.

ट्रम्प म्हणाले होते - शाळा उघडायला हव्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, शाळा उघडायला हव्या. कारण मुलांमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी जबरदस्त रोगप्रतिकारक शक्ती असते. ते म्हणाले होते की, लहान मुलांची इम्यूनिटी सिस्टम आपल्यापेक्षाही मजबूत असते. ट्रम्प यांच्यानुसार न्यू जर्सीमध्ये आतापर्यंत केवळ एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तो मुलगा डायबिटीसचा रुग्ण होता. ट्रम्प म्हणाले होते की, डायबिटीस रुग्ण असलेल्या मुलांचीही इम्यूनिटी सिस्टम खूप मजबूत असते.

ट्विटरने फॅक्ट चेकिंग सिस्टम सुरू केली आहे

ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती रोखण्यासाठी नवीन फॅक्ट चेकिंग सिस्टम सुरू केली आहे. यानुसार ट्विटरने अनेक वेळा ट्रम्प यांचे ट्विट डिलीट केले आहेत. मिनेपोलिसमध्ये कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लायड यांच्या मृत्यूनंतर आंदोलकांवर ट्रम्प यांनी गोळी झाडण्याची धमकी दिली होती. तेव्हा ट्विटरने त्यांच्या ट्विटवर टॅग लावला होता. ट्विटरने लिहिले होते की, आम्ही हिंसेला प्रोत्साहन हेत नाही.

बातम्या आणखी आहेत...