आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा एफबीआयवर पासपोर्ट चोरल्याचा आरोप:म्हणाले - घराच्या शोधात अधिकाऱ्यांनी माझे 3 पासपोर्ट घेतले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एफबीआयने मार-ए-लागो येथील मालमत्तेवर छापे मारताना तीन पासपोर्ट चोरल्याचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. एफबीआय एजंट्सने घरातून कागदपत्रांचे 15 बॉक्स घेतले, ज्यात काही वर्गीकृत नोंदी आहेत, असेही त्यांनी म्हटले. एफबीआयने गेल्या मंगळवारी माजी राष्ट्राध्यक्षांच्या आलिशान पाम हाऊस आणि मार-ए-लागो रिसॉर्टवर छापे टाकले होते.

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, 'मार-ए-लागो येथे छाप्यादरम्यान, एफबीआयने माझे 3 पासपोर्ट चोरले. त्यापैकी एकाची मुदत संपली होती. राजकीय प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्याचा हा सर्वात वाईट स्तर आहे.

निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचे षडयंत्र

गेल्या आठवड्यात एफबीआयच्या छाप्यानंतर ट्रम्प म्हणाले की, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत यापूर्वी कधीही घडले नव्हते. तपास यंत्रणांना सहकार्य करुनही अशी कारवाई केली जात आहे. न्याय व्यवस्थेचा गैरवापर होत आहे. हा कट्टर डाव्या लोकशाहीवाद्यांचा हल्ला आहे. मी 2024 ची निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा नाही.

रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांनी गेल्या वर्षी व्हाईट हाऊस सोडले. तेव्हा त्यांनी अनेक कागदपत्रे सोबत घेतली होती. मात्र, आतापर्यंत एफबीआयकडून या आरोपाला पुष्टी मिळालेली नाही. ही कागदपत्रे अनेक मोठ्या बॉक्समध्ये मार-ए-लिगो येथे नेण्यात आल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून अमेरिकेच्या गुप्तचर संस्था ट्रम्प आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर लक्ष ठेवून आहेत. या छाप्याचाही संबंध त्याच्याशी जोडला जात आहे.

टॉयलेट फ्लश करण्यासाठी वापरली कागदपत्रे
काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांच्यावर कार्यालयात असताना अधिकृत कागदपत्रे फाडल्याचा आणि फ्लश केल्याचा आरोप करण्यात आला होता. ट्रम्प यांनी इतके पेपर फ्लॅश केले की त्यामुळे व्हाईट हाऊसचे टॉयलेट तुंबले. माजी राष्ट्रपतींच्या कागदपत्रे फाडण्याच्या सवयीचीही इतर बाबींबरोबरच चौकशी व्हावी, अशी नॅशनल आर्काइव्हची इच्छा आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार मॅगी हेबरमन यांनी 'कॉन्फिडन्स मॅन' या पुस्तकात या प्रकरणाची माहिती दिली आहे. पुस्तकानुसार, व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की पेपरमुळे टॉयलेट अडकले आहे. त्यानंतर असे मानले जात होते की ट्रम्प यांनी कागदपत्रे फ्लश केली होती.

बातम्या आणखी आहेत...