आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:ट्रम्प यांनी विजयाचा खोटा प्रचार केला, ई-मेलने निधीच्या नावाखाली 2 हजार कोटी उभारले

अमेरिका17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या निवडणुकीत जाणूनबुजून विजयाचा खाेटा प्रचार केला. त्यामागे नागरिकांकडून निधीच्या नावाखाली माेठी रक्कम गाेळा करण्याचा ट्रम्प यांचा कट हाेता. सिनेटच्या सभागृह समितीसमाेरील दुसऱ्या सुनावणीत सनसनाटी दावे केले आहेत. ट्रम्प यांचे तत्कालीन अॅटर्नी जनरल विल्यम बर्र म्हणाले, निवडणुकीचा निकाल जाहीर हाेण्याच्या आधीच ट्रम्प यांनी स्वत:चा विजय झाल्याचे जाहीर केले. त्याचा खाेटा प्रचारही केला. ट्रम्प यांचे निवडणूक प्रचार प्रमुख राहिलेले बिल स्टिपेन यांनी आपल्या जबाबात ट्रम्प तसेच त्यांच्या सर्व सल्लागारांनाही खाेटा प्रचार करू नका, अशी सूचना केली हाेती. परंतु ट्रम्प यांनी रुडाॅल्फ गुइलिएनी या सल्लागाराच्या म्हणण्यानुसार स्वत:च्या विजयाचा खाेटा प्रचार केला. वास्तविक गुइलिएनी मद्यधुंद स्थितीत हाेते.

वास्तविक आपला पराभव हाेत असल्याचे ट्रम्प यांनी ठाऊक हाेते. परंतु त्यांनी खाेटा प्रचार करून नाेव्हेंबर २०२० नंतर इलेक्शन डिफेन्स फंड उभारण्याची घाेषणा केली. ट्रम्प यांच्या टीमने आपल्या लाखाे समर्थकांना पैशांसाठी ई-मेल पाठवले. ट्रम्प यांनी या निधीचा वापर निवडणूक घाेटाळ्याला न्यायालयात आव्हान देण्यासाठी आणि इतर कामांसाठी करण्याचे ठरवले हाेते. ई-मेलनंतर काही दिवसांतच २ हजार कोटी रुपये उभारण्यात आले.

मुलाच्या गर्लफ्रेंडला ३ मिनिटे भाषणासाठी ४७ लाख
मुलगा डाेनाल्ड ट्रम्प ज्युनियरची मैत्रीण किम्बर्ली हिने ६ जानेवारीच्या सभेत तीन मिनिटांचे भाषण दिले. त्याबदल्यात तिला ४७ लाख रुपये देण्यात आले. किम्बर्ली फाॅक्स न्यूजची प्रेझेंटर हाेती. ट्रम्प यांनी निधीतून आपल्या कुटुंबाला लाभ मिळवून दिल्याचे एका समितीच्या तपासात समाेर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...